शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

नगर पालिका कर्मचाऱ्यांच्या जीवन विम्यासाठी कामगार संघटना आक्रमक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 11:40 IST

येत्या आठवडाभरात पालिका कामगारांचा विमा न उतरविल्यास कामगार संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना फायटर्स म्हणून अत्यावश्यक सेवा देणाºया नगर पालिका आणि नगर पंचायत क्षेत्रातील कामगारांना सुरक्षा देण्यासाठी त्यांचा जीवन विमा उतरविण्यासाठी कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. येत्या आठवडाभरात पालिका कामगारांचा विमा न उतरविल्यास कामगार संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला. त्याचवेळी शासनाच्या दुजाभावाचाही निषेध संघटनांकडून करण्यात येत आहे.राज्य शासनाने आरोग्य विभागाच्या डॉक्टर व इतर कर्मचारी, पोलिस कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विमा उतरविला. मात्र, महानगर पालिका, नगर पालिका, नगर पंचायतीतील सफाई कामगारांसह इतरही कर्मचाºयांचा विमा उतरविला नाही. राज्यातील नगर पालिका, नगर पंचायत आणि महापालिका क्षेत्रातील कामगार संघटनांमध्ये तीव्र निषेध व्यक्त होत आहे. कोरोना फायटर्स म्हणून लढणारे पालिका कर्मचारी संकटात सापडले आहेत. महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायतीतील सफाई, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी राज्यातील ३६३ शहरात सेवारत आहेत.गत महिनाभरापासून सफाई कामगाराचा जीवन विमा काढण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे कर्मचारी नगर पालिका क्षेत्रातील कामगार संघटना आंदोलनाचे हत्यार उपसण्याची शक्यता आहे.आपातकालीन परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता काम करणाºया कामगारांनी यासंदर्भात एक रणनितीही आखली आहे. कर्मचाºयांचा जीवन विमा उतरवित असताना शासनाकडून दूजाभाव करण्यात आला आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता सेवारत असलेल्या कामगारांचा विमा न उतरविल्यास कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल.- मोहन अहीरसदस्य, महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी, संघटना

टॅग्स :khamgaonखामगावEmployeeकर्मचारी