बुलडाणा : छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३८६ वा जयंती उत्सव बुलडाण्यात १९ फेब्रुवारी साजरा होत आहे. त्याकरिता जिजामाता प्रेक्षागाराच्या प्रांगणात ५१ फूट उंचीची महाराजांची प्रतिमा उभारण्यात आली आहे. या सोहळ्यातील मानवंदनेसाठी छत्रपतींच्या पावन स् पर्शाने पुनीत झालेल्या रायगडावरून पवित्र माती आणली असून, ज्यांनी शिवराय घडविले, त्या मॉ जिजाऊंच्या सिंदखेडराजा येथील राजवाड्यावरून अखंड मशाल कार्यक्रमाच्या ठिकाणी आणली जात आहे. बुलडाणा येथील छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित शिवजयंती सोहळ्यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता ५१ फूट उंचीच्या महाराजांच्या प्र ितमेला मानवंदना होईल. यानंतर पाळणा, लोकनृत्य, शाहिरी पोवाडा, समूहगान आदि सांस्कृतिक कार्यक्रमांचे जिजामाता प्रेक्षागार येथे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २ च्या सुमारास येथील संगम चौकातून भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे. या शोभायात्रेचा कारंजा चौकात समारोप करण्यात येईल. या उत्सवात डी.जे. न वाजविता रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. शोभायात्रेत सहभागी मंडळांमधून उत्कृष्ट देखावे सादर करणार्या मंडळांना पुरस्कार दिले जाणार आहे. सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन उत्सव समितीने केले आहे. आज शिवजयंती उत्सव शोभायात्रेसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन. बुलडाणा : छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३८६ वा जयंती उत्सव बुलडाण्यात १९ फेब्रुवारी साजरा होत आहे. त्याकरिता जिजामाता प्रेक्षागाराच्या प्रांगणात ५१ फूट उंचीची महाराजांची प्रतिमा उभारण्यात आली आहे. या सोहळ्यातील मानवंदनेसाठी छत्रपतींच्या पावन स् पर्शाने पुनीत झालेल्या रायगडावरून पवित्र माती आणली असून, ज्यांनी शिवराय घडविले, त्या मॉ जिजाऊंच्या सिंदखेडराजा येथील राजवाड्यावरून अखंड मशाल कार्यक्रमाच्या ठिकाणी आणली जात आहे. बुलडाणा येथील छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित शिवजयंती सोहळ्यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता ५१ फूट उंचीच्या महाराजांच्या प्र ितमेला मानवंदना होईल. यानंतर पाळणा, लोकनृत्य, शाहिरी पोवाडा, समूहगान आदि सांस्कृतिक कार्यक्रमांचे जिजामाता प्रेक्षागार येथे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २ च्या सुमारास येथील संगम चौकातून भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे. या शोभायात्रेचा कारंजा चौकात समारोप करण्यात येईल. या उत्सवात डी.जे. न वाजविता रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. शोभायात्रेत सहभागी मंडळांमधून उत्कृष्ट देखावे सादर करणार्या मंडळांना पुरस्कार दिले जाणार आहे. सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन उत्सव समितीने केले आहे.
आज शिवजयंती उत्सव
By admin | Updated: February 19, 2016 01:37 IST