शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
3
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
4
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
5
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
6
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
7
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
8
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
9
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
10
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
11
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
12
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
13
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
14
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
15
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
16
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
17
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
18
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
19
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
20
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?

लोणार तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; चार दुकाने फोडली

By admin | Updated: May 10, 2017 07:16 IST

८ मेच्या रात्री झालेल्या चोरीमध्ये एकूण अंदाजे २७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

लोणार : शहरातील लोणी मार्गावर खटकेश्वर नगरमधील ओम साई ई -महासेवा केंद्र आणि कुंभारे विमा सेवा केंद्रामध्ये ८ मेच्या रात्री झालेल्या चोरीमध्ये एकूण अंदाजे २७ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची घटना घडली. ९ मे रोजी सकाळी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भाऊसाहेब सातपुते यांनी घटनास्थळी जाऊन तपास केला.लोणार-लोणी मार्गावर असलेल्या खटकेश्वर नगरमध्ये भारत दराडे यांचे ओम साई ई-महासेवा केंद्र असून, त्या ठिकाणी भारतीय स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्रही चालविले जाते. यामुळे त्यांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणावर पैशाचे व्यवहार होतात. ८ मे रोजी लग्नसराई दाट असल्यामुळे भारत दराडे रात्री कार्यालयात येऊ शकले नाहीत. त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी ८ मे रोजीच्या रात्री कार्यालयाचे शटर वाकवून चोरी केली. पैसे वाटप झाल्याने कार्यालयात असलेले केवळ ४ हजार ५०० रुपये चोरीला गेले. त्यानंतर शेजारीच असलेल्या कुंभारे विमा सेवा केंद्राच्या कार्यालयाचेही कुलूप तोडून २२ हजार ५०० रुपये चोरट्यांनी लंपास केले. ९ मेच्या सकाळी हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी भारत दराडे यांना दूरध्वनीवरून कळविले. चोरी झाल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भाऊसाहेब सातपुते यांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. पुढील कारवाई पो.उ.नि. उकंडराव राठोड करीत आहेत