शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन चोरट्याने फोडली तीन दुकाने

By admin | Updated: April 26, 2017 00:43 IST

चिखली : शहरातील बस स्थानक परिसरात ३ ते ४ दुकानांचे शटर वाकवून चोरी करणाऱ्या एका १५ वर्षीय बाल गुन्हेगारास सीसीटीव्हीच्या मदतीने पकडण्यात पोलिसांना यश आले.

बाल गुन्हेगारास तत्काळ अटक : सीसी कॅमेऱ्यांची मदत चिखली : शहरातील बस स्थानक परिसरात ३ ते ४ दुकानांचे शटर वाकवून चोरी करणाऱ्या एका १५ वर्षीय बाल गुन्हेगारास सीसीटीव्हीच्या मदतीने पकडण्यात पोलिसांना यश आले असून, त्याच्याकडून चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे.याबाबत शेलूद येथील शिवाजी सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २५ एप्रिल रोजी सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे आपले बस स्टँड रोडवरील गॅरेज उघडले असता, गॅरेजमधील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले, तसेच गॅरेजच्या पाठीमागील शटर एका बाजूने उचकटलेले दिसून आले. दरम्यान गॅरेजमधील अ‍ॅपेच्या दोन बॅटरी किंमत ८ हजार रुपये व सुमारे १० हजार रुपये किमतीचे दोन सेल आणि एक गस सिलिंडर असा एकूण २० हजार रुपयांचा माल चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी चिखली पोलिसांना दिली. दरम्यान, परिसरात शोध घेतला असता शिवाजी महाराज चौकातील प्रल्हाद कऱ्हाडे यांचे व बाबूसिंग राजपुरोहित यांच्याही दुकानचे शटर वाकवून त्याचे गल्ल्यातील चिल्लर व नगदी तसेच मोबाइल फोन चोरून नेल्याचे समजले. दरम्यान, राजपुरोहित यांच्या स्वीट मार्टमधील सीसी कॅमेराची तोडफोड करण्यात आली होती. तर कऱ्हाडे यांच्या राधा टी हाउसमधील सीसीटीव्हीचे २ कॅमेरे काढून टेबलावर ठेवण्यात आले होते. मात्र; हॉटेलमधील ३ रा कॅमेरा आरोपीला काढता न आल्यामुळे त्याचे सर्व कारनामे या कॅमेरामध्ये कैद झाले. विशेष म्हणजे सीसीटीव्हीद्वारे होणारे चित्रीकरण साठवण्यासाठी असलेल्या डी.व्ही.आर.(डीजिटल व्हिडिओ रेकॉर्डर) हे उपकरणदेखील चोरण्याचा त्याने प्रयत्न केल्याचे दिसून आल्याने या चोरीच्या घटनेतील आरोपी अल्पवयीन असला तरी त्याला या नवीन तंत्रज्ञानाबाबत संपूर्ण माहिती होती. दरम्यान, सीसीटीव्हीतील फुटेजच्या आधारे चिखली पोलिसांनी ठाणेदार महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात तातडीने कारवाई करून या गुन्ह्यातील आरोपीस शिताफीने अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे. या बाल गुन्हेगाराबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, शहरातील यापूर्वी घडलेल्या अनेक चोऱ्यांमध्ये त्याचा सहभाग असून, बाल गुन्हेगार असल्यामुळे तो कायद्याच्या कचाट्यातून सुटतो.