शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

एकाच कुटुंबातील तिघांनी घेतले विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:53 IST

खामगाव : व्याजाची रक्कम अदा केल्यानंतरही रक्कम वसुलीसाठी   सुरू असलेल्या सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाच कुटुंबा तील तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. तिघांपैकी एकाचा मृत्यू  झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणात दोघांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देअवैध सावकाराचा फास एकाचा मृत्यू, दोघे गंभीरसावकारी प्रकरणात दोघांना अटक 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : व्याजाची रक्कम अदा केल्यानंतरही रक्कम वसुलीसाठी   सुरू असलेल्या सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाच कुटुंबा तील तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. तिघांपैकी एकाचा मृत्यू  झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणात दोघांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खामगाव येथील  जोहार्ले लेआउटमधील देवेंद्र जामोदे यांनी  व्यवसायासाठी वाडी येथील निर्मला रामचंद्र कबाडे यांच्याकडून  व्याजाने चार लाख रुपये घेतले होते. या पैशांची व्याजासह पर तफेड करण्यात आली; मात्र अतिरिक्त पैशांसाठी कबाडे  यांच्याकडून सातत्याने तगादा लावण्यात आला. देवेंद्र जामोदेंसह  त्यांचे वडील आणि भावालाही पैशांची मागणी करीत, शिवीगाळ  केली.  दरम्यान, कबाडे यांचा भाऊ प्रकाश रामकृष्ण गावंडे रा.  टिळक मैदान याने देवेंद्र जामोदे यांचा कोर्टासमोरील पानठेला  ‘नोटरी’ करून ताब्यात घेतला. तसेच रक्कम वसुलीसाठी  सावकाराचा त्रास सुरूच होता. या त्रासाला कंटाळून देवेंद्र  जामोदे (३५), श्रीराम जामोदे (६५), नरेंद्र जामोदे (३0) यांनी  रविवारी रात्री विष प्राशन केले. ही बाब कळताच कुटुंबीयांनी  ितघांना खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.  दरम्यान, नरेंद्र जामोदे यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने  अकोला येथे हलविण्यात आले. अकोला येथे उपचार सुरू  असतानाच नरेंद्र जामोदे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात देवेंद्र   जामोदे यांच्या तोंडी जबाबावरून शहर पोलिसांनी निर्मला कबाडे  आणि प्रकाश गावंडे यांच्याविरुद्ध मुंबई सावकारी  अधिनियमाच्या कलम ३२, ३३, सहकलम ३९, महाराष्ट्र  सावकारी अधिनियम व भारतीय दंड विधानाच्या कलम ५0४,  ५0६ नुसार गुन्हा दाखल केला.

आणखी सहा तक्रारी!व्याजाच्या पैशांची परतफेड केल्यानंतरही अतिरिक्त पैशांची  मागणी होत असल्याप्रकरणी गणेश ओंकार खंडारे (५0) रा.  वाडी यांच्यासोबतच गायत्री प्रशांत धर्माधिकारी रा. शेगाव,  विनायक सुरेश जवळकार रा. सुटाळपुरा,  शिवकुमार प्रभुदस  अ्रठावलकर रा. समता कॉलनी, शैलेश किसनराव दाणे रा. गो पाळनगर, सुनील जांभुरकर रा. सावजी ले-आउट यांचा समावेश  असून, खंडारे यांच्या तक्रारीत व्याजाच्या पैशांपायी गावंडे याने  जबरदस्तीने घर खरेदी करून घेतल्याचेही नमूद केले आहे.  तक्रारीमध्ये निर्मला कबाडे,  प्रकाश रामकृष्ण गावंडे,  सोनल  प्रकाश गावंडे, विजय राजेंद्र कबाडे, अक्षय गावंडे, शुभम यांची  नावे आहेत.

सर्च ऑपरेशनमध्ये सापडले आक्षेपार्ह दस्तावेज!देवेंद्र जामोदे यांच्या तक्रारीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक  शशीकुमार मीणा यांच्या मार्गदर्शनात खामगाव पोलीस स्टेशनचे  ठाणेदार यू.के. जाधव यांच्या पथकाने सोमवारी सकाळी देवेंद्र  गावंडे आणि निर्मला कबाडे यांच्या घराची झडती घेतली अस ता, कोरे बॉन्ड, बक्षीस पत्र, पासबुक, गहाण खत, कोरे चेक  आणि इतर आक्षेपार्ह दस्तावेज सापडला असून, अनेकांचा  संबंधितांनी छळ केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. पोलिसांनी  सदर दस्तावेज जप्त केला आहे.

आता मुलांना दोन घास भरविता येतील!अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळलेल्या दोन महिलांना  पोलीस स्टेशनमध्ये आपले अश्रू अनावर झाले होते. दिवसभर  राबराब राबल्यानंतरची कष्टाची कमाई सावकार घेऊन जात हो ता. दरम्यान, आता पोलिसांच्या मदतीने तक्रार दाखल करता  आल्याने, दिवाळीत मुलांना दोन घास भरविता येतील, अशा प्र ितक्रिया महिलांनी नोंदविल्या. दरम्यान, पोलिसांमध्ये तक्रार  देण्यासाठी पुढाकार घेणार्‍यांना सावकारांकडून धमक्या  मिळल्या; मात्र काहींनी भीक न घालता पोलिसात तक्रारी दाखल  केल्या. 

खामगाव पोलिसांची संवेदनशीलता!अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाच कुटुंबातील  ितघांनी विष प्राशन केले. यापैकी एका युवकाचा मृत्यू झाला. या  परिवाराच्या दु:खात प्रत्यक्ष सहभाग नोंदवित, खामगाव  पोलिसांनी दाखविलेल्या संवदेनशीलतेबाबत समाजमनात  सोमवारी चांगल्या प्रतिक्रिया उमटल्या. जामोदे परिवाराला उ पचारासोबतच नरेंद्र जामोदे यांच्या अंत्यसंस्कारालाही ठाणेदार  यू.के. जाधव यांच्यासह पथकाने सढळ मदत केली.

व्याजाच्या पैशांसाठी छळ करणार्‍या सावकाराच्या जाचाला  कंटाळून आत्महत्येचा कुणीही निर्णय घेऊ नये. अवैध  सावकारांविरोधात निर्भीडपणे पोलिसांत तक्रार नोंदवावी. प्र त्येकाला न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे.-यू.के. जाधव, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन, खामगाव.