शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात तलवारीच्या हल्ल्यात तीघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 15:51 IST

तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना एकता नगरात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: मशीदीचा रस्ता वापरण्याच्या कारणावरून एकाच समाजाच्या दोन कुटुंबात वाद झाला. या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. यावेळी तलवारीचा वापर करण्यात आल्याने तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना एकता नगरात घडली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एकता नगरातील नाजीया परवीन मो. फिरोज ही महिला पती आणि मुलींसह शनिवारी घरात होती. त्यावेळी त्यांच्या शेजारी राहणारे आबीद अली, गुलाम अली, त्यांचा मुलगा आजम अली दुसरा मुलगा अशरफ अली आणि मुलगी शहजादी सहेर हे चौघे घरासमोर आले. मशीदीचा रस्ता वापरण्याच्या कारणावरून विवाहितेला शिविगाळ केली. या प्रकरणाची माहिती शेजारी आणि समाजातील ज्येष्ठांना मिळताच त्यांनी हे प्रकरण आपसात मिटविले. त्यानंतर या घटनेची माहिती विवाहितेचा भाऊ मो. शोएब रा. झिरा बावडी, अकोला यास मिळाली. त्यानंतर तो आपल्या तीन-चार मित्रांसह अकोला येथून तिच्या घरी आला. यावेळी विवाहितेच्या भावाला आणि मित्रांना पाहून पुन्हा वाद निर्माण केला. त्यानंतर आजम अली याने तिच्या भावाला तलवारीने खांद्यावर वार करून जखमी केले. तसेच इतरांनी विवाहितेला आणि तिच्या पतीला लोखंडी पाईप आणि लोखंडी सळईने मारहाण केली. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून उपरोक्त चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.(प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी