कोरोना बाधितांचे जिल्ह्यात त्रिशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:51 AM2021-02-23T04:51:49+5:302021-02-23T04:51:49+5:30

रविवारी तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी १,५३६ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३०१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर १,२३५ जणांचे ...

Three hundred in the district of Corona victims | कोरोना बाधितांचे जिल्ह्यात त्रिशतक

कोरोना बाधितांचे जिल्ह्यात त्रिशतक

googlenewsNext

रविवारी तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी १,५३६ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३०१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर १,२३५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा ५६, अजिसपूर दोन, सागवन चार, सुंदरखेड एक, माळवंडी एक, शेगाव पाच, घाटपुरी एक, सुटाळा एक, हिवरखेड एक, वरखेड एक, खामगाव २३, नांदुरा तीन, उंद्री तीन, रायपूर दोन, हातणी एक, गुंजाळा एक, दहिगाव एक, सोमठाणा सहा, सावरगाव डुकरे तीन, महिमळ एक, पिंपळगाव एक, गजरखेड एक, भोकर एक, रानुबाई एक, मेंडगाव एक, कोलारा दोन, चांधई एक, टाकरखेड दोन, पिंपळवाडी एक, अमडापूर तीन, शेलूद एक, मुंगसरी एक, आंचरवाडी नऊ, मंगरुळ नवघरे दोन, मालखेड तीन, खैरव एक, चिखली ४९, मलकापूर एक, भोरटेक तीन, शेलापुर एक, दे. राजा 27, पिंपळगाव एक, मेहुणा राजा एक, पिंपळनेर एक, किन्ही एक, नगणगाव दोन, दे. मही तीन, अंढेरा एक, डोणगांव दोन, जानेफळ ९, अंजनी एक, हिवरा दोन, मेहकर दोन, सिं. राजा शहर दोन, चिंचोली एक, साखर खर्डा चार, किनगाव राजा दोन, गारगुंडी एक, लोणार १९, पिंपळनेर एक, सुलतानपूर एक, वेणी एक, मोताळा सहा, तिव्हाण एक, भोनगाव एक, जवळा एक आणि जालना जिल्ह्यातील धोलखेड येथील एक तर सवासानी येथील एक, अकोला जिल्ह्यातील अकोट येथील दोन, अकोला शहरातील रामदास पेठमधील दोन जणांचा कोरोना बाधितांमध्ये समावेश आहे. दरम्यान, चिखली तालुक्यातील सवणा येथील ८० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे ९४ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये बुलडाणा येथील कोविड केअर सेंटरमधून १९, देऊळगाव राजा १४, चिखली ३५, नांदुरा दोन, जळगाव जामाेद एक, सिंदखेड राजा दोन, मलकापूर सात, खामगाव तीन, शेगावमधील ११जणांना सुटी देण्यात आली आहे. दरम्यान, तपासणी करण्यात आलेल्या १ लाख २० हजार ४३१ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर १४५९० जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

--३,५०९ अहवालांची प्रतीक्षा--

तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या ३,५०९ जणांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात सध्या एकूण १६,१४६ कोरोना बाधित असून त्यापैकी १,३६९ सक्रिय रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १८७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Web Title: Three hundred in the district of Corona victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.