शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानगंगा अभयारण्यात हवेत तीन फायर; ४० ते ४५ मेंढपाळांचा वन कर्मचाऱ्यांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 22:56 IST

दोन कर्मचाऱ्यांना मारहाण

बुलडाणा: ज्ञानगंगा अभयारण्यातील खामगाव वन परीक्षेत्रातंर्गत येत असलेल्या पिंपळगाव नाथ भागात गस्तीवर असलेल्या वन्यजीव विभागाच्या पथकावर ४० ते ४५ मेंढपाळांनी प्राणघात हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यामुळे वनपरीक्षेत्र अधिकारी दीपेश लोखडे यांनी हवेत तीन फायर केले. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांचा जीव वाचविण्यात त्यांना यश आले आहे.

ज्ञानगंगा अभयारण्यात मेंढ्या चारणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान वन्यजीव विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर वनपरीक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे हे त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांसह खामगाव वन्यजीव परीक्षेत्रातंर्गत गस्तीवर गेले होते. दरम्यान पिंपळगाव नाथ भागात काही मेंढपाळ चराई करत असल्याचे या गस्ती पथकाच्या दहा ऑगस्ट रोजी दुपारी निदर्शनास आले. त्यावेळी सबंधितांना हटकण्यात आले असता त्यांनी वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांवर लाठ्या काठ्यांनी हल्ला चढवला. त्यामध्ये दोन वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना मेंढपाळांनी मारहाण सुरू केल्यामुळे वनपरीक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे यांनी परिस्थीतीचे गांभिर्य पाहत हवेत पिस्तूलाचा एक फायर केला. त्यामुळे तेथील दहा ते १२ मेंढपाळ पळून गेले.

दरम्यान त्यांच्या काही साथीदारांना याी माहिती मिळाल्यानंतर जवळपास ४० ते ४५ जणांचा जमाव पुन्हा गस्ती पथकाच्या अंगावर आला. त्यांच्यावर लाठ्या काठ्या, शस्त्रे असल्याने वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या जीवित्वाला धोका निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचे गांभिर्य पाहता दीपेश लोखंडे यांनी रिव्हॉलवरमधून पुन्हा हवेत दोन फायर केले. त्यामुळे हल्ला करणारे घटनास्थळावरून पळून गेले. या प्रकरणी वन गुन्हा दाखल करण्यात आला असून बोराखेडी पोलिसांनाही यासंदर्भात एक पत्रही वन्यजीव विभाग देणार असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.

विशिष्ट आवाज करून बोलावले

प्रारंभी पळून गेलेल्या १० ते १५ व्यक्तींनी विशिष्ट आवाज करून त्यांच्या मदतीसाठी आणखी काही जणांना पिंपळनाथ भागात बोलावले. अवैधरित्या संरक्षणीत वनक्षेत्रात मेंढ्यांची चराई करण्याचा प्रघातच अलिकडील काळात पडला आहे. यापूर्वीही ज्ञानगंगा अभयारण्यात वन्य जीव विभागाच्या कर्मचाऱ्यांवर असे हल्ले झालेले आहेत. त्यामुळे एखादवेळी असा प्रसंग उद्भवल्यास आरोपी आरोपी विशिष्ट आवाज करून त्यांच्या सहकाऱ्यांना मदतीस बोलावत असल्याचे वनपरीक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे यानी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.

अभयारण्यात अवैध मेंढी चराईचे प्रमाण अधिक आहे. ही मंडळी स्थानिक वनकर्मचाऱ्यांचेही ऐकत नाहीत. वनकर्मचाऱ्यांनी त्यांना हटकल्यास ते वन कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून येतात. १० ऑगस्टला गस्तीवर असताना हे मेंढपाळ अभयारण्यात दिसले. त्यांना हटकण्याचा गस्तीवरील वनकर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला. पण, ते अंगावर धावून गेल्याने वनकर्मचाऱ्यांना वाचविण्याकरिता हवेत तीन फायर करावे लागले. फायरनंतर ते मेंढपाळ घटनास्थळावरून पळून गेले.

- दीपेश लोखंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी

टॅग्स :buldhanaबुलडाणा