शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
5
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
6
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
7
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
8
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
9
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
10
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
11
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
12
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
13
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
14
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
15
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
16
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
17
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
18
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
19
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
20
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!

तीन डॉक्टरांवरच चालतो प्रसूती विभागाचा कारभार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 12:36 AM

खामगाव : येथील जिल्हा सामान्य  रुग्णालयात महिन्याला  सरासरी ३00 प्रसूती तर ८0 सिजेरीयन केल्या जातात. वैद्यकीय सुविधांसाठी केवळ तीनच डॉक्टर असून,  पॅरामेडिकल स्टॉफसुद्धा अपुरा  असल्याने उपचार करणार्‍या   डॉक्टरांची तारांबळ उडते. 

ठळक मुद्देवैद्यकीय सुविधांसाठी केवळ तीनच डॉक्टर

गजानन राऊत। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील जिल्हा सामान्य  रुग्णालयात महिन्याला  सरासरी ३00 प्रसूती तर ८0 सिजेरीयन केल्या जातात. याशिवाय  इतर उपचारासाठी महिला रुग्णालयात भरती होत असतात. या  सर्व वैद्यकीय सुविधांसाठी केवळ तीनच डॉक्टर असून,  पॅरामेडिकल स्टॉफसुद्धा अपुरा  असल्याने उपचार करणार्‍या   डॉक्टरांची तारांबळ उडते. खामगाव तालुक्यासह नांदुरा, शेगाव, संग्रामपूर तालुक्यातील  महिला या रुग्णालयात विविध आजारांसाठी उपचारासाठी येत  असतात.  रुग्णालयात साधारणत: दर महिन्याला २५0 ते ३00  प्रसूती होतात. याशिवाय ७0 ते ८0 सिजेरीयन होतात. गर्भवती  मातांना सेवा सुविधा पुरवण्यासोबतच इतर आजाराच्या वर्षाकाठी  ३ हजार बॉटल रक्ताची देवाण-घेवाण होते. तर वर्षाकाठी ७  हजार लोकांना डायलेसीस करून देण्यात येते. तसेच अस् िथव्यंगाचे ऑपरेशन, डोळ्यांचे ऑपरेशन, अतिदक्षता विभाग,  ट्रामा केअर सेंटर, सोनोग्राफी सेवा, आयुष विभागामध्ये  आयुर्वेदिक, होमिओपॅथिक सेवा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे  महात्मा जोतिबा फुले जीवनदायी योजना शालेय आरोग्य तपासणी  पथक आणि सर्पदंशावर उपचार या सर्व सेवा खामगावच्या  जिल्हा सामान्य रुग्णालयात देण्यात येतात.प्रामुख्याने या रुग्णालयात प्रसूतीसाठी महिलांची मोठय़ा प्रमाणात  गर्दी होते. वर्ग १ दर्जाचे १४ डॉक्टर या ठिकाणी मंजूर आहेत. प्र त्यक्षात मात्र तीनच डॉक्टर सध्या सेवा देत आहेत. याशिवाय वर्ग  २ दर्जाचे २४ वैद्यकीय अधिकारी याठिकाणी मंजूर आहेत; परंतु  प्रत्यक्षात १७ डॉक्टर सेवेत आहेत. याठिकाणी वर्ग १ दर्जाचे  ११  आणि वर्ग २ दर्जाचे ७ पदे रिक्त आहेत. या सर्व डॉक्टरांच्या जागा  भरल्या तर येथील रुग्णांना आणखी चांगली सेवा मिळू शकते.  वैद्यकीय अधीक्षकांनी याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा  केला, तरी पदे भरण्यास विलंब होत असल्याचे वास्तव आहे.  परिणामी, डॉक्टरांना सेवा देण्यास अडथळा निर्माण होत आहे.  खामगाव जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये २२५ खाटा आहेत  आणि भरती होणार्‍या रुग्णांची संख्या यापेक्षा कितीतरी पट जास्त  आहे. त्यामुळे २२५ ते ३00 खाटांसाठी वाढीव प्रस्ताव हा  आरोग्य मंत्र्यांकडे पाठवला आहे. खामगाव शहरातून खासगी त था सिल्व्हरसिटी हॉस्पिटलमधून अकोला किंवा अन्य ठिकाणी  पेशंट रेफर करण्यात येत असतात; परंतु मागील वर्षभरामध्ये डॉ क्टरांची संख्या कमी असूनसुद्धा खामगाव सामान्य  रुग्णालयामधून सिल्व्हरसिटी हॉस्पिटलपेक्षा रुग्ण रेफर कमी  केलेले आहेत. ही महत्त्वाची बाब असल्याचे डॉ. शंकर वानखडे  व डॉ. नीलेश टापरे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले.

एसएनसीयूची र्मयादा वाढवण्याची गरजस्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट (एसएनसीयु) १४ ची मान्यता या  रुग्णालयात आहे; परंतु प्रत्यक्षात मात्र जवळपास ४0 नवजात  शिशुंना सेवा देण्यात येते. अतिशय सोयीयुक्त हे युनिट असून,  विनामूल्य येथे सर्व सोयी उपलब्ध आहेत. बाहेर खासगी  दवाखान्यामध्ये ४ हजार रुपये एका दिवसाचे बाळ पेटीत ठेवावे  लागतात; परंतु येथे मात्र विनामूल्य सेवा आहे. त्यामुळे या १४ ची  संख्या २0 ने आणखी वाढविण्याचा प्रस्ताव हॉस्पिटल प्रशासनाने  संबंधित विभागाकडे पाठविला आहे. तो लवकर मंजुरात व्हावा,  यासाठी स्थानिक राजकीय पदाधिकारी व जिल्हा वैद्यकीय  अधिकारी यांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. 

कान,नाक,घसा तज्ज्ञाचे पद रिक्तया रुग्णालयात कायमस्वरुपी कान,नाक,घसा व जनरल सर्जनचे  पद रिक्त आहे. या आजाराचे रुग्णसुद्धा मोठय़ा प्रमाणात उ पचारासाठी येतात; मात्र डॉक्टरांची उपलब्धता नसल्याने रुग्णांना  ताटकळत बसण्याची वेळ येते. 

डॉक्टरांची संख्या वाढावी, यासाठी सतत प्रयत्न सुरु असून,  खामगाव येथे बेडची संख्या सुद्धा दुपटीने होण्याचा प्रस्ताव  पाठविण्यात आला आहे. अति तत्काळ सेवेसाठी बाहेरुनसुद्धा  आम्ही डॉक्टरांना पाचारण करीत असतो. जेणेकरुन सर्व रुग्णांना  वेळेवर उपचार झाला पाहिजे, हे आमचे उद्दिष्ट आहे.- शंकरराव वानखडे, वैद्यकीय अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय, खामगाव. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर