शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडकडे तीन कोटी थकीत; लोणारातील शेतकरी सापडला अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:39 IST

लोणार : गुलाबी बोंडअळीनंतर गारपिटीमुळे शेतकर्‍यांवर संकटाची मालिका सुरू असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यातच शेतकरी हितासाठी शासनाने नाफेडतर्फे सुरू केलेल्या हमी भाव केंद्रावर मूग, उडीद, सोयाबीन विकल्यानंतरही ३ कोटी ७ लाख रुपयांचे चुकारे थकीत असल्यामुळे  शेतकर्‍यांच्या डोक्यावर सावकारी कर्जाचा डोंगर वाढत आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी विवाह समारंभ मोडण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : गुलाबी बोंडअळीनंतर गारपिटीमुळे शेतकर्‍यांवर संकटाची मालिका सुरू असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यातच शेतकरी हितासाठी शासनाने नाफेडतर्फे सुरू केलेल्या हमी भाव केंद्रावर मूग, उडीद, सोयाबीन विकल्यानंतरही ३ कोटी ७ लाख रुपयांचे चुकारे थकीत असल्यामुळे  शेतकर्‍यांच्या डोक्यावर सावकारी कर्जाचा डोंगर वाढत आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी विवाह समारंभ मोडण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.  शासकीय हमी भाव केंद्रावर तूर विकण्यासाठी लोणार तालुक्यात गेल्या महिनाभरात अंदाजे ५ हजार शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली; मात्र तूर खरेदी केंद्र सुरू होत नसल्याने अनेक शेतकर्‍यांना, व्यापार्‍यांना तूर विकून पैसे मोकळे करून घेतले. उशिरा तूर खरेदी केंद्र सुरु झाल्याने शेतकरी मात्र अधिकच दुखावला गेला आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी शासकीय खरेदी केंद्रावर मूग, उडीद व सोयाबीन शेतकर्‍यांनी मोठय़ा अपेक्षेने विकला. शासकीय हमी भाव मिळेल आणि पैसेही लवकर मिळतील, या अपेक्षेने शेतकर्‍यांनी विकलेल्या शेतमालाचे मात्र अजून पैसे मिळालेले नाहीत. तर शेतकर्‍यांजवळ असलेली जमापुंजी संपलेली असून, मुलीच्या विवाहापासून तर शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कर्ज वसुलीसाठी बँकेने तगादा लावल्याने ३ ते ५ टक्के व्याजदराने सावकाराकडून कर्ज घेतले जात आहे. नाफेड खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसे न मिळाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांनी नगदी पैसे मिळण्यासाठी कमी भावात व्यापार्‍यांना माल विकत आहेत. 

७१९ शेतकर्‍यांची आहे समस्यालोणार तालुक्यातील ७१९ शेतकर्‍यांचा ४ हजार ९८0 क्विंटल उडीद नाफेडने खरेदी केला आहे, तर २ कोटी ६८ लाख ९२ हजार रकमेपैकी ५३४ शेतकर्‍यांना १ कोटी ८७ लाख ९४ हजार रूपयांचे वाटप करण्यात आले आहे; मात्र उडिदाचे अजून, ८0 लाख ९८ हजार रुपये नाफेडकडे बाकी आहेत, तसेच  ३९८ शेतकर्‍यांनी २ हजार १९३ क्विंटल मूग नाफेडला विकला. १ कोटी २२ लाख २५ हजार रुपये रकमेपैकी ३३४ शेतकर्‍यांना १ कोटी ६ लाख ५२ हजार रुपये देण्यात आले; मात्र अजूनही ६४ शेतकर्‍यांचे १५ लाख ७३ हजार रुपये नाफेडकडे बाकी आहेत.  

टॅग्स :Farmerशेतकरी