शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेकडे पैशांची मागणी, मारहाण करून केला विनयभंग

By अनिल गवई | Updated: November 20, 2023 21:22 IST

याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आले आहे.

खामगाव-ओळखीचा फायदा घेऊन मोबाईल मध्ये काढलेले महिलेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन दोघांनी तिच्याकडे पैशांची मागणी केली तसेच घरात घुसून सदर महिलेस मारहाण करत तिचा विनयभंग केल्याची घटना स्थानिक सिव्हिल लाईन भागात घडली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. याबाबत पीडित महिलेने

दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की, तिची व नितीन उर्फ बाबू शंकरराव खिरडकर (४५) रा. दालफेल बाची दोन वर्षा पासून ओळख असल्याने ते दोघे बाहेर दर्शनासाठी तसेच जेवणासाठी जात होते. या दरम्यान गैरफायदा घेत खिरडकर हा पीडित महिलेचे फोटो स्वतःचे मोबाइल मध्ये काढत होता. असे असतांना मागील तीन महिन्यांपासून त्यांच्यात वाद निर्माण झाला असून खिरडकर हा या महिलेकडे पैश्याची मागणी करू लागला.

तिने पैसे देण्यास नकार दिला असता त्याने मोबाइल मधील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच त्याने व कुणाल कैलास पालीवाल (२४) रा. शिवाजीवेस याने फोन करून अश्लील शिवीगाळ केली. ते दोघे सदर महिलेच्या घरी आले व अश्लील शिवीगाळ करून ५ लाख रूपये दे तुझी सोन्याची पोथ दे, नाहीतर आंम्ही तुझे फोटो वायरल करून तुला बदनाम करु असे म्हणून निघुन गेले. त्यानंतर ते पुन्हा पीडित महिलेच्या घरी आले व भाडेकरू यांच्या घरात घुसले व त्यांना म्हटले की, 'हे आमचे घर आहे, खाली करा नाहीतर पैसे दया नाहीतर तुमचे भांडे घरातुन फेकुन देतो'.

आवाज आल्याने ही महिला खाली येवुन त्यांना समजावीत असतांना त्या दोघांनी मारहाण करून या महिलेच्या अंगावरील कपडे फाडले व तुझे मुलीस पळवून नेऊन ठार मारू, अशी धमकी दिली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी नितीन उर्फ बाबू शंकरराव खिरडकर, व कुणाल कैलास पालीवाल या दोघांविरुद्ध कलम ३८४, ३५४, ४५२, २९४, ३२३,३४ भादंवी नुसार गुन्हा दाखल केला असून उपरोक्त दोघांना अटक केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग