शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वाघांच्या शिकारीचा धोका; महागिरी महादेव यात्रेला सशर्त परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 17:45 IST

संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथून १५ किमी अंतरावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पात अंबाबरवा अभयारण्यातील अतिसंरक्षित गाभा (कोर) क्षेत्रात महागिरी येथे एका पर्वतावर महादेवाचे अधिष्ठान आहे.

अझहर अली

संग्रामपूर (बुलढाणा) : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून वाघांच्या शिकारीच्या घटनांबाबत महाराष्ट्र राज्यातील व्याघ्र प्रकल्पांना (रेड अलर्ट) धोक्याचा इशारा देण्यात आहे. विदर्भातील अभयारण्यात वाघांची शिकार करणारी बावरीया जमातीची टोळी सक्रिय झाल्याची शक्यता असल्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट अंबाबरवा अभयारण्यातील अतिसंरक्षित गाभा (कोर) क्षेत्रात श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महागिरी महादेव येथील यात्रेस येणाऱ्या भाविकांना विविध निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे, यात्रेला वन्यजीव विभागाकडून सशर्त परवानगी देण्यात आली आहे.

संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथून १५ किमी अंतरावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पात अंबाबरवा अभयारण्यातील अतिसंरक्षित गाभा (कोर) क्षेत्रात महागिरी येथे एका पर्वतावर महादेवाचे अधिष्ठान आहे. ४ सप्टेंबर रोजी येथे यात्रा भरणार आहे. तेथे पंचक्रोशीसह इतर ठिकाणांवरून येणाऱ्या भाविकांची गर्दी उसळणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वन्यजीव विभागाने अटीशर्तीसह भाविकांना महादेवाच्या दर्शनासाठी परवानगी दिली आहे. यात्रेच्या दिवशी सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे. भक्तांना शेंबा तपासणी नाक्यापर्यंत वाहनाने जाता येईल. तेथे पार्किंगची व्यवस्था आहे. येथून पुढे अभयारण्यात महादेवाच्या पर्वतापर्यंत भाविकांना पायी जावे लागणार आहे.

अभयारण्यात यात्रेदरम्यान ढोल, ताशे, डफळे, ध्वनिक्षेपक इतर वाद्यांसह तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट, मद्य, तसेच कोणत्याही प्रकारचे शस्त्र सोबत नेण्यास बंदी आहे. अभयारण्यात प्लास्टीक पिशवी, पाणी बॉटल तसेच प्लास्टीकचे कुठलेही साहित्य वापरण्यास मनाई आहे. महागिरी येथील महादेवाचे मंदिर सोडून अभयारण्यात इतर ५० मीटरच्या भागात जाण्यास मज्जाव केला आहे. बंदी घातलेल्या वस्तू, साहित्य आढळल्यास जप्त केल्या जातील, असे सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालय (वन्यजीव)कडून बजावण्यात आले.

महाराष्ट्रात टोळी सक्रियजुलै २०२३ मध्ये राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून वाघांच्या शिकारीच्या घटनांबाबत महाराष्ट्र राज्यातील व्याघ्र प्रकल्पांना (रेड अलर्ट) धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार व्याघ्र प्रकल्पांतर्गत व नजीकच्या क्षेत्रात वन्यजीव विभागाकडून सक्त कारवाईचा आदेश आहे.

श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी यात्रेला सशर्त परवानगी आहे. भाविकांनी सूचनांचे पालन करावे, बंदी असलेल्या ठिकाणी जाऊ नये, तसेच बंदी असलेले साहित्य सोबत ठेवू नये.सुनील वाकोडेवनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव)

टॅग्स :buldhanaबुलडाणा