या आरोपींना ७ मे रोजी पोलिसांनी अटक केली होती. यामध्ये मधुकर मोकळे ऊर्फ चिक्कू (३५), लखनसिंग सरदारसिंग बावरी, कृष्णा विजय लहाने, भुवन मंगलसिंग ठाकूर ऊर्फ बंटी, गोविंद सतीश हेडा, मंगेश गजानन देशमुख यांचा समावेश होता. विना परवाना शस्त्र बाळगणे व त्याचा वापर तथा जिल्हाधिकाऱ्यांच्या कोविड संसर्गाच्या संदर्भाने लावण्यात आलेल्या संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, ६ मे रोजी ही घटना घडली होती. यात गुन्हा दाखल असलेल्या सातव्या आरोपीने ६ मे रोजीच नंतर दुपारी मेहकर येथील शाळा क्रमांक सहाच्या परिसरात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता वाढली होती. प्रकरणी पोलिसांनी प्रकरणाशी संबंधित सर्वच सहा जणांना ताब्यात घेतले होते. प्रकरणात त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची ९ मेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
‘त्या’ सहा आरोपींना पोलिस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:36 IST