शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
3
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
4
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
5
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
6
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत
7
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
8
कतरिना कैफही आहे गरोदर? ओव्हरकोट ड्रेसमध्ये दिसला बेबीबंप; नवऱ्यासोबत लंडनमध्ये फेरफटका
9
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
10
'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
11
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
12
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
13
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
14
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
15
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
16
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
17
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 
18
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
19
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
20
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 

अपु-या पावसाअभावी सिंचन प्रकल्प तहानलेले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 1:37 AM

धाड : पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटत आहे; परंतु अद्यापही पुरेसा आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस बुलडाणा तालुक्यात नसल्याने, या ठिकाणी सर्व सिंचन प्रकल्प तहानलेले आहेत.

ठळक मुद्देखरिपाच्या पिकांवर संकट : शेतकरी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कधाड : पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटत आहे; परंतु अद्यापही पुरेसा आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस बुलडाणा तालुक्यात नसल्याने, या ठिकाणी सर्व सिंचन प्रकल्प तहानलेले आहेत.सतत अवर्षणग्रस्त वातावरण, पिकांचे वारंवार पावसाअभवी होणारे हाल आणि कमी होणारे पर्जन्यमान, यामुळे पीक पेरणी क्षेत्रावर याचा विपरीत परिणाम होत आहे. सध्या बुलडाणा तालुक्यातील पेरणी क्षेत्रापैकी सोयाबीन पिकास फुले लागली असून, काही ठिकाणी सोयाबीनला वाद्या लागल्या आहे, तर गेल्या सप्ताहभरापासून पावसाचा थेंबही पडला नसल्याने फुले व वाद्याची गळती निश्चित होऊन सोयाबीनला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या सोयाबीन पीक फळधारणेकडे जात असताना पावसाची उघडीप जीवघेणी ठरत आहे. सोबतच कमी प्रमाणात असणाºया पावसाच्या प्रमाणामुळे खरिपाची सर्वच पिके धोक्यात सापडली आहेत. उघडीपने वरचेवर पिकांना पाण्याची मोठी गरज भासत आहे. पावसाचे पाण्यावर तग धरणारी पिकं विहिरीच्या पाण्यावर दम मारण्यास असमर्थ ठरत आहेत.५५ हजारांवर असणाºया पेरणीक्षम क्षेत्रावर मका, कपाशीचे क्षेत्र वाढले आहे, तर सोयाबीन त्याचे खालोखाल आहे. नगदी पीक असणाºया पिकांना पाण्याची ओढ सहन करावी लागत आहे. मागील वर्षी आतापर्यंत किमान तालुक्यातील सिंचन प्रकल्पांना पुरेसा जलसाठा आला होता, तर किमान पिकांना पाण्याची ओढ सहन करावी लागली नव्हती. सध्या वातावरण जरी ढगाळ असले, तरी वाºयासोबत वाहून जाणारे ढग कोरडेच ठरत आहे. विचित्र वातावरणाचा आभास हा दुष्काळाकडे वाटचाल करणारा ठरतो की काय, असा प्रश्न शेतकºयांना पडत आहे. शेतकºयांचे माथी सदैव नैसर्गिक संकटाची मालिका असल्याने तो याच्याशी अनेक वर्षांपासून लढा देत आहे; परंतु शासनाने कर्जमाफी घोषित करून अद्यापपर्यंत अंमलबजावणी न केल्याने हे सुलतानी संकट त्यांच्यावर आल्याने यामधून कसे सावरायचे हा प्रश्न त्यांना पडला आहे.