शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
4
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
5
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
6
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
7
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
8
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
9
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
10
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
11
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
12
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
13
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
14
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
15
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
16
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
17
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
18
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
19
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या

अट्टल चोरांना अटक करुन १९ मोटारसायकल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 16:00 IST

त्यांच्याकडून १९ मोटारसायकली जप्त करण्यात आल्यात.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पोलीसांना मोटारसायकल चोर तालुक्यातील चिखली सुर्वे रस्त्याकडून येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीव्दारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी सापडा रचून त्यांना पकडल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली. पोलीस तपासात पकडण्यात आलेले आरोपी अट्टल सायकलचोर असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून १९ मोटारसायकली जप्त करण्यात आल्यात.वाशिम शहरातील समता नगर , अल्लाडा प्लाट भागातून गत तीन दिवसापूर्वी चोरीस गेलेली मोटारसायकल घेवून शिवाजी राठोड व त्याचा मित्र बद्रीनारायण घुगे हे चिखली सुर्वे रस्त्याने येत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक शिवाजी ठाकरे  यांनी आपले अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचारी यांना चिखली सुर्वे रोड पुढील कारवाई साठी रवाना केले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर, पोलीस उपनिरिक्षक भगवान पायघन व त्यांचे पथकातील कर्मचाºयांनी दोन्ही आरोपीस अडविले. या दोन्ही आरोपींची चौकशी केली असता मोटारसायकलवरील इसमांचे नाव शिवाजी रामदास राठोड, वय ५० वर्ष, रा. डोंगर खंडाळा, ता.जि.बुलढाणा, ह.मु. भास्कर बिल्डींग शासकीय कर्मचारी निवासस्थान वाशिम व बद्रीनारायण ज्ञानबा घुगे, वय ३९ वर्ष, रा. मांडवा ता.रिसोड जि. वाशिम ह.मु. सिव्हील लाईन वाशिम असे असल्याचे निष्पन्न झाले.  त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटारसायकल विषयी चौकशी केली असता त्यांनी तीन दिवसाआधी समतानगर अल्लाडा प्लॉट भागातुन चोरी केली असल्याची कबुली दिली. वरून सदर मोटारसायकल तपासात जप्त करण्यात आली व दोन्ही इसमांना गुन्हयात अटक केली.जळगाव, नांदेड, अकोला, हिंगोली,वाशिम जिल्हयात चोरी शिवाजी रामदास राठोड याने  उदरनिवार्हासाठी प्रथम जळगाव येथुन नंतर नांदेड, अकोला, हिंगोली आणि वाशिम जिल्हयातुन १८ मोटारसायकल चोरी केल्या. चोरी केलेल्या मोटारसायकल  राठोड व त्याचा मित्र  घुगे यांनी वाशिम शहर व  परिसरात  विक्री केल्या काहिंना उसने पैसे पाहीजेत असे म्हणुन पैसे परत करे पर्यंत गाडी ठेवुन चोरी केलेल्या मोटारसायकलींची विल्हेवाट लावली.राठोड समाजकल्याण विभागातील कर्मचारी  शिवाजी राठोड याने पुर्वी वाशिम समाजकल्याण विभागात नोकरी केली . त्याची दोन वषार्पुर्वी जळगाव येथे वरिष्ठ काळजीवाहक पदावर बदली झाली . अपघात झाल्याने आजारी रजेवर होता. प्रकृती ठीक झाल्यानंतर त्याने रुजू न होता चोरी सुरु केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिस