शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात साकारणार ३९ नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:31 IST

मराठी माध्यमाच्या २८ व उर्दू माध्यमाच्या ११ अशा एकूण ३९ शाळांना विज्ञान केंद्र उभारणीसाठी साहित्य राज्यस्तरावरुन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

- सोहम घाडगे लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ३९ शाळांमध्ये नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रे साकारण्यात येणार आहेत. वैज्ञानिक उपकरणे प्रत्यक्ष हाताळण्याची संधी यामाध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.समग्र शिक्षा अभियानांतर्गत सन २०१९ -२० या वर्षात मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रे साकारले जात आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी राज्याकडे उपलब्ध असलेल्या यु- डायस २०१८-१९ च्या माहितीवरुन आणि जिल्हा परिषद, नगरपालिककेत असलेल्या गट, शहर साधन केंद्रातील शाळेमध्ये अतिरिक्त स्वतंत्र वर्गखोली, विद्यूत सुविधा, शाळेची पटसंख्या इ. निकषांना आधारभूत ठेऊन नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारणीसाठी शाळांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या २८ व उर्दू माध्यमाच्या ११ अशा एकूण ३९ शाळांना विज्ञान केंद्र उभारणीसाठी साहित्य राज्यस्तरावरुन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना शाळेत विद्यूत जोडणी असलेली ५०० चौरस फूट आकाराची आरसीसी स्लॅब असलेली खोली पुरवठादारास तातडीने उपलब्ध करुन द्यावी लागणार आहे. विज्ञान केंद्र उभारणीच्या प्रक्रियेसाठी शाळेत गणित, विज्ञान शिक्षकांची नेमणूक करण्यासह मुख्याध्यापकांना स्वत: या कामात लक्ष घालावे लागणार आहे. मोताळा तालुक्यातील बोराखेडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी शाळेत सुसज्ज खोली व सर्व सुविधा उपलब्ध असून दोन विज्ञान शिक्षक नियुक्त असल्याचे सांगितले.

विज्ञान केंद्र मंजूर झालेल्या मराठी शाळाचिखली तालुक्यातील वरखेड, खामगाव तालुक्यातील अंत्रज, हिवरखेड, देऊळगावराजा तालुक्यातील मेहुणा राजा, खल्याळ गव्हाण, पिंपळगाव चिलमखाँ, मोताळा तालुक्यातील बोराखेडी, लोणार तालुक्यातील जांभूळ, पांग्रा डोळे, मांडवा, मलकापूर तालुक्यातील हरसोळा, वाघुड, वरखेड, मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख, आरेगाव, बोरी, जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा बु., सुनगाव, पळशी सुपो, नांदुरा तालुक्यातील वाडी महाळूंगी, आलमपूर, संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा, शेगाव तालुक्यातील पहूरझिरा, चिंचोली, सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा, देऊळगाव कोळ, उमरद येथील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये नाविन्यपूर्ण विज्ञानकेंद्र मंजुर झाले आहे.

विज्ञान केंद्र मंजूर झालेल्या उर्दू शाळाविज्ञान केंद्रे मंजूर झालेल्या उर्दू शाळांमध्ये बुलडाणा तालुक्यातील बुलडाणा, धाड, देऊळघाट, चिखली तालुक्यातील उंद्री, खामगाव तालुक्यातील कंझरा, मोताळा तालुक्यातील कोथळी, राजूर, नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी, संग्रामपूर तालुक्यातील बावनबिर, आलेवाडी, शेगाव तालुक्यातील अळसनाचा समावेश आहे.

नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रांमुळे विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागेल. विज्ञान केंद्र पाहण्यासाठी मोठ्या शहरात जाण्याची गरज पडणार नाही. आपल्याच शाळेत विज्ञानाचे प्रयोग करण्यासह वैज्ञानिक उपकरणे हाताळण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल.- डॉ. श्रीराम पानझाडेशिक्षणाधिकारी, जि. प. बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाscienceविज्ञानSchoolशाळा