सोयाबिनचा उत्पादन खर्चही निघाला नाही?

By Admin | Updated: October 26, 2014 23:32 IST2014-10-26T23:32:06+5:302014-10-26T23:32:06+5:30

एकरी तीस किलो सोयाबिन पेरले व वीस किलोचे उत्पादन झाले.

Is there no cost to produce soyabean? | सोयाबिनचा उत्पादन खर्चही निघाला नाही?

सोयाबिनचा उत्पादन खर्चही निघाला नाही?

सुहास वाघमारे / नांदुरा
कापसाला पर्याय म्हणून सोयाबिनच्या नगदी पिकाकडे वळलेल्या शेतकर्‍यांना यावर्षी सुरवा तीला व परतीच्या पावसाने दडी मारल्याने सोयाबिनच्या उत्पादन खर्चा एवढे उत्पन्न सोयाबिनचे उत्पादन तर तालुक्यातील एका शेतकर्‍याला चक्क त्याच्या पाच एकरात िक्वंटलभर बारीक ज्वारीच्या आकाराचे सोयाबिन झाले असून प्रति एकर तिस किलो पेरले व विस किलोचे उत्पादन झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
यावर्षी परतीचा पाऊस आलाच नाही. त्यामुळे सोयाबिन उत्पादनात प्रचंड घट झाली असून एकरी दहा हजारापर्यंत उत्पादन खर्च लागलेल्या सोयाबिन पिकाचे प्रति एकरी एक ते दोन िक्वंटल एवढेच उत्पादन होत असून त्याचा आकार ज्वारीप्रमाणे असून त्याला जेमतेम दोन हजार पाचशे पर्यंतचे भाव मिळत असल्याने अर्धाच उत्पादन खर्च निघत असल्याने शेतकरी धास्तावलेला आहे. आधीच सोयाबिनचा अर्धा उत्पादन खर्च निघाला नाही पावसाने दडी मारल्याने तुरीचे उत्पादनात प्रचंड घसरत तर काहींच्या शेतात शुन्य उत्पादनाची भिती व्यक्त होत आहे. त्यामुळे सोयाबिन पाठोपाठ तुरीच्या उत्पादनाच्या भितीने शेतकरी धास्तावलेला आहे.
विदर्भातील कोरडवाहू शेतकर्‍यांचे सोयाबिन व तुर हे पहिल्या पसंतीचे पिक बनले आहे. मात्र यावर्षी उशीरा आलेल्या पावसामुळे उत्पादनाट घट होण्याची भिती होती. त्यातच शेवटी परतीचा पाउस आलाच नाही. त्यामुळे सोयाबिन व तुरीचे पिक धोक्यात आले आहे. त्याचत आता सोयाबिन या पिकाची काढणी सुरु झाली आहे. तर काही शेतकर्‍यांना यापेक्षाही अ त्यल्प उत्पादन झाल्याची चर्चा शेतकरी वर्गात आहे. सोयाबिन पिकाने उत्पादन खर्च दिला नाही. व आता शेतात उभे असलेले तुरीच्या पिकाची स्थिती गंभीर असून पाऊस नसल्याने तुरीच्याही उत्पादनात प्रचंड घसरन होणार असल्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
कोरडवाहू शेतकर्‍यांसाठी सोयाबिन व तुर ह्या दोन्ही पिकांच्या उत्पादनातील घट व उत्पादन खर्च वसुल होत नसल्याने हरभर्‍या सारखे पिक हि घेणे दुरापास्त झाले आहे. या सर्व आ िर्थक भिषण परिस्थितीत राज्यात शासन स्थापन होणे बाकी आहे. तर केंद्राचे याकडे दूर्लक्ष होत असल्याने शेतकरी वर्ग धास्तावलेला व प्रचंड आर्थिक तणावात असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.

*खर्च दहा हजार उत्पादन पाच हजाराचे
सोयाबिन या पिकाच्या उत्पादन खर्चाची गोळा बेरीज केली तर बियाणे, मशागत, पेरणी, विंधन, मळणी, व वाहतूक यावरचा खर्च एकरी दहा हजारापर्यंत होतो व त्यातही तननाशक व किटकनाशकाचा वापर केला तर खर्च वाढतो. मात्र यावर्षी एकरी एक ते दोन क्विंटल सोयाबिनचे उत्पादन घेत असल्याने बाजारभावाप्रमाणे पाच हजारापर्यंत उत्पादन म्हणजे खर्चाच्या अर्धा खर्च वसुल होत असल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

Web Title: Is there no cost to produce soyabean?