शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव नगर पालिका संकुलातील चोरी संशयाच्या भोवऱ्यात! पाणी पुरवठा विभागाचे १४ लाखांचे साहित्य लंपास 

By अनिल गवई | Updated: October 13, 2022 19:04 IST

खामगाव नगर पालिका संकुलातील चोरी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 

खामगाव (बुलडाणा) : स्थानिक नगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे तब्बल १४ लाखांचे महागडे सामान चोरी गेल्याचे प्रकरण आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. चोरी प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे होत असल्याने, या प्रकरणाचा तपास करताना पोलीसही भांबावून गेलेत. त्याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेकडूनही या चोरीची चाचपणी केली जात असल्याचे समजते. खामगाव नगर पालिका प्रशासकीय इमारती नजीक निर्माणाधिन सांस्कृतिक सभागृहामागील व्यापारी संकुलातील पहिल्या माळ्यावर असलेल्या एका गोदामात नवीन नळ जोडणी आणि पाणी पुरवठा विभागाचे साहित्य ठेवले होते. यामध्ये नवीन वॉटर मीटर, पितळी व्हॉल्व आणि इतर साहित्याचा समावेश असून  गोदामाचे शटर तोडून साहित्य चोरी गेल्याचे नगर पालिका पाणी पुरवठा विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर १३ जुलै २०२२ रोजी पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या परवानगीने शहर पोलिस स्टेशन मध्ये ही तक्रार देण्यात आली. गुंतागुंतीमुळे शहर पोलिसांनी स्थळ निरिक्षणानंतरच याप्रकरणी तक्रारीनंतर दोन दिवसांनी गुन्हा दाखल केला होता. 

असाही योगायोग पाणी पुरवठा विभागाचे साहित्य चोरी गेले त्या रात्री नगर पालिकेच्या उत्तर प्रवेशद्वारावरील सीसी कॅमेरा बंद होता. त्याचवेळी पालिकेत रात्री कर्तव्यावर असलेला सुरक्षा रक्षक नेमका काय करीत होता? चोरी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी कंत्राटदाराचा अमरावती, नागपूरचा प्रवास कशासाठी? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे.

चोरी की साहित्य केवळ कागदोपत्री व्यापारी संकुलातील एका गाळ्याचे कुलूप तोडून साहित्य चोरून नेण्यात आले. चोरीनंतर चोरी झाल्यासारख्या कोणत्याही खुणा आढळून न आल्यामुळे सर्वप्रथम पोलीसांनीच या चोरी प्रकरणी संशय व्यक्त केला. त्यानंतर आता स्थानिक गुन्हे शाखेनेही येथे पाहणी केल्याचे समजते. दरम्यान, येथे खरच चोरी झाली की केवळ कागदोपत्री पालिकेच्या दप्तरी साहित्याची नोंद झाली? हा प्रश्न सद्यस्थितीत अनुत्तरीत आहे.

नगर पालिकेतील चोरी 'एलसीबी'च्या रडावर खामगाव नगर पालिकेच्या व्यापारी संकुलातील चोरी पूर्वीपासूनच संयशाच्या भोवºयात सापडली आहे. खामगाव शहर पोलीसांनीही घटनास्थळाची पाहणी केल्याशिवाय तात्काळ गुन्हा दाखल केला नव्हता. दरम्यान, पाणी पुरवठा विभागाचे महागडे साहित्य चोरी गेल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाकडूनही पाहणी करण्यात आली आहे. 

नगर पालिकेच्या व्यापारी संकुलातील चोरी प्रकरणी पालिका प्रशासनाने तक्रार दाखल केली होती. पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर जुलै महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  याप्रकरणी पोलीसांचा पुढील तपास सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पाहणी आणि तपासणीबाबत आपणास माहिती नाही. अशी माहिती खामगावचे शहर पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी दिली.   

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाtheftचोरी