शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीला लागली गळती, खामगावचा पाणी पुरवठा विस्कळीत

By अनिल गवई | Updated: June 10, 2024 13:42 IST

वीज समस्या सुरळीत होताच, जलवाहिनीची समस्या ऐरणीवर

खामगाव: शहराला पाणी पुरवठा करणार्या खामगाव ते गेरू माटरगाव येथील जलवाहिनीला गळती लागली. तीन ते चार ठिकाणी जलवाहिनी फुटल्याने खामगाव शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी, खामगाव शहरातील पाणी टंचाई आणखी तीव्र होणार असल्याचे दिसून येते.

शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी तालुक्यातील गेरू माटरगाव धरणावरून जळका भडंग येथील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत सुमारे २२ किलोमीटर पाइपलाइन टाकण्यात आली आहे. गेरू माटरगाव येथील धरणावरून जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाणी आणल्यानंतर जळका येथील जलशुध्दीकरण केंद्रात पाणी शुध्द केल्यानंतर घाटपुरी पाण्याची टाकीपर्यंत पाणी नेले जाते. तसेच वामन नगरातील बुस्टर पंप आणि घाटपुरी टाकीवरून शहराच्या विविध भागात पाण्याचा पुरवठा केल्या जातो. 

दरम्यान, वारंवार होत असलेल्या तांत्रिक बिघाडामुळे पाणी पुरवठ्यात व्यत्यय निर्माण होतो. कधी वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे पाणी पुरवठा लांबणीवर पडतो. तर कधी पाइपलाइनला गळती लागल्यानंतर शहरातील पाणी प्रश्न ऐरणीवर येतो. त्यामुळे नागरिकांना  पाणी समस्येला नियमित तोंड द्यावे लागत असल्याचे दिसून येते.

गेरू माटरगाव येथे लागली गळतीगेरू माटरगाव येथील धरण शिवारातील तारासिंग नामक शेतकर्याच्या शेताजवळ पाइपलाइनला दोन ते तीन ठिकाणी गळती लागली. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा आता लांबणीवर पडणार आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वीच वीज पुरवठ्याच्या समस्येमुळे पाणी समस्या उद्भवली होती. तब्बल १६ तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर आता पाइपलाइनला गळती लागली आहे.

चिखलामुळे दुरूस्तीत अडथळाधरण परिसरात झालेल्या पावसामुळे रस्ते चिखलमय झाले आहेत. शिवाय शेत शिवारातही पावसाचे पाणी साचल्याने पाइपलाइन दुरूस्तीत अडथळा निर्माण झाल्याचे समजते. त्यामुळे आगामी दोन ते तीन दिवस शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत राहणार असल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी