शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आधाराशिवाय उभेही राहता येईना, नंतर पूर्ण केली मॅरेथॉन; बुलडाण्यातील डॉक्टर महिलेने केली कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 06:28 IST

लाँग कोविडदरम्यान त्या तीन महिने व्हीलचेअरवर होत्या. केवळ इच्छाशक्ती व मानसिक कणखरपणाच्या जोरावर हाफ मॅरेथॉनमध्ये धावल्या.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : लाॅंग कोविड झाला. दुसऱ्याच्या आधाराशिवाय त्यांना उभेही राहता येत नव्हते. वर्षभरापूर्वी ही स्थिती अनुभवणाऱ्या एका महिला डॉक्टरने गेल्याच आठवड्यात इंटरनॅशनल हाफ मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केली. प्रबळ जिद्दीच्या बळावर त्यांनी ही शारीरिक तंदुरुस्ती मिळवली. 

डॉ. अश्विनी जाधव असं त्यांचं नाव. त्या मूळच्या मुंबईच्या. लग्नानंतर बुलडाण्यात सासरी आल्या. आधी त्यांना गेल्या वर्षी २६ मार्चला कोरोना झाला. त्यानंतर त्या लाॅंग कोविडला सामोऱ्या गेल्या. आधाराशिवाय त्यांना उभे राहता येत नव्हते. वर्षभरात त्यांनी त्यावर मात केली आणि २७ फेब्रुवारी रोजी पुण्यात झालेली इंटरनॅशनल हाफ मॅरेथॉन (२१ किमी) २ तास ५० मिनिटांमध्ये पूर्ण करत शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित केले.

लाँग कोविडदरम्यान त्या तीन महिने व्हीलचेअरवर होत्या. केवळ इच्छाशक्ती व मानसिक कणखरपणाच्या जोरावर हाफ मॅरेथॉनमध्ये धावल्या. डॉ. अश्विनी यांनी ५२ दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या जवळच्या गर्भवती नातेवाईकाचे मरण बघितले. त्याचा त्यांना जबर मानसिक धक्का बसला होता. परंतु, त्यातून सावरत त्यांनी लाँग कोविडवर मात केली. शारीरिक तंदुरुस्तीला प्राधान्य दिले. प्रारंभी साधे १०० मीटर चालणेही अवघड होते. आधी कार्डियाक फिटनेसला प्राधान्य दिले. तीन इको नॉर्मल आल्यानंतर त्यांनी चालण्यास सुरूवात केली. दोन किलोमीटर दररोज चालल्यानंतर आत्मविश्वास दुणावला आणि त्यांनी जीम सुरू केली. त्यानंतर धावण्याची आवड असलेले पती डॉ. विनोद जाधव यांच्यासमवेत त्यांनी धावण्याचा सराव सुरू केला. त्यात त्यांना आवड निर्माण झाली व आयुष्यात प्रथमच थेट पुणे इंटरनॅशनल हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होत ही स्पर्धा पूर्णही केली.

डॉक्टर ॲण्ड फिटनेस ग्रुपची मदतसोशल मीडियावरील देशातील ३० हजार डॉक्टरांच्या ग्रुपमधील ॲक्टिव्हिटी पाहून त्यांनाही काहीतरी वेगळं करण्याची उत्सुकता लागली. याच ग्रुपमधील दिल्लीतील डॉ. अभिषेक राज आणि टेक्सासमधील डल्लास येथील डॉ. आदित्य शर्मा यांनी त्यांना ऑनलाईन कोचिंग दिले.