शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डीजेच्या तालावर नाचत बसला नवरा, तिने निवडला 'दुसरा'; विवाह सोहळा ठरला चर्चेचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 10:30 IST

मलकापूर पांग्रा येथील मुलीचा विवाह कंडारी येथील युवकाबरोबर २२ एप्रिलला ठरला होता. दुपारी साधारण ३.३० वाजत लग्नाची वेळ होती. त्यापूर्वी वराकडील मंडळी लग्नमंडपात पोहोचणे अपेक्षित होते. मात्र झाले उलटे, पाहुणे उशिरा आले.

सिंदखेडराजा : गत काही वर्षांपासून लग्न ठरलेल्या वेळेत लागत नसल्याचे चित्र आहे. याला अनेक कारणे असली तरी नवरदेवांसमोर नाचणारी मंडळी हे एक प्रमुख कारण आहे. डीजेच्या तालावर थिकरणाऱ्या मित्रांच्या नादात एकावर नवरीच गमावण्याची वेळ आली. वरात लग्न मंडपात उशिरा पोहोचल्याने संतप्त झालेल्या वधूकडील मंडळींनी लग्नच मोडले. एवढेच नव्हे तर दुसऱ्याच मुलाबरोबर या मुलीचा विवाहही आटाोपला. मलकापूर पांग्रा येथील हा विवाह सोहळा परिसरातच नव्हे तर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

मलकापूर पांग्रा येथील मुलीचा विवाह कंडारी येथील युवकाबरोबर २२ एप्रिलला ठरला होता. दुपारी साधारण ३.३० वाजत लग्नाची वेळ होती. त्यापूर्वी वराकडील मंडळी लग्नमंडपात पोहोचणे अपेक्षित होते. मात्र झाले उलटे, पाहुणे उशिरा आले. त्यामुळे लग्नापूर्वी केल्या जाणाऱ्या धार्मिक विधींना अपेक्षेप्रमाणे उशीर झाला. लग्नाच्या वेळेत विधी झाल्याने परण्या निघण्यासदेखील उशीर झाला. इथपर्यंत सर्व काही ठीक होते. मात्र, नवरदेवाची वरात निघाली आणि डीजे, बँडच्या तालावर थिरकणारे नवरदेवाचे मित्र मैदानात उतरले. मद्यधुंद अवस्थेत थिरकण्याच्या नादात दुपारचे लग्न तब्बल चार ते पाच तास उशिराने लागण्याची परिस्थिती निर्माण झाली.

लग्न न लावताच परतला नवरदेववधूकडील मंडळींचा संयम संपला होता. वरात लग्न मंडपात येताच वधूच्या नातेवाइकांनी नवरदेवाकडील मंडळींना उशीर का केला, असा प्रश्न विचारला. संयम संपलेल्या नवरीकडील मंडळींचा पारा चढलेला होता. तसा नवरदेवाकडील मंडळींचादेखील पारा चढला, वादविवाद, झटापट झाली आणि नवरीकडील मंडळींनी जवळच्या पाहुण्यांशी सल्लामसलत करून नवरदेवाला लग्न न लावताच माघारी जाण्याचे फर्मान काढले! वाद वाढला... पण नवरदेवाकडील मंडळींना अखेर लग्न मंडपातून लग्नाशिवाय काढता पाय घ्यावा लागला.

नाचण्याच्या नादात गमावू नका नवरीलग्न ठरविताना लग्न मुहूर्त काढला जातो, मात्र सध्याच्या परिस्थितीत मुहूर्तावर कुठेच लग्न लागत नाही. नवरदेवाच्या मित्रमंडळींना थिरकायचे असते तर वधूकडील मंडळींना लग्नापेक्षा सत्कार समारंभात अधिक रस असतो. याचा परिणाम लग्न मुहूर्तावर होऊ लागला आहे. याचा विचार दाेन्हीकडील मंडळींनी करण्याची काळाची गरज आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा