शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-औरंगाबाद राज्य महामार्गावरच थाटले वाहनतळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 13:50 IST

डोणगाव (जि. बुलडाणा ) : येथून नागपूर-औरंगाबाद हा राज्यमहामार्ग गेलेला असून येथील बसथांबा रोडला लागूनच आहे. त्यामुळे रोडवर वाहने उभी राहतात. राज्य महामार्गाला वाहनतळाचे स्वरूप येत असून येथे वाहतूकीची कोंडी निर्माण होते.

ठळक मुद्देएसटी बस चालक, वाहकांना राज्य महामार्गावर बस उभ्या कराव्या लागत असल्याने डोणगाव येथे बस थांबा हा राज्य महामार्ग बनला आहे. बसस्थानक नसल्याने बसचालकास बस राज्य महामार्गावर उभी करावी लागत असल्याने अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होतो.

डोणगाव (जि. बुलडाणा ) : येथून नागपूर-औरंगाबाद हा राज्यमहामार्ग गेलेला असून येथील बसथांबा रोडला लागूनच आहे. त्यामुळे रोडवर वाहने उभी राहतात. राज्य महामार्गाला वाहनतळाचे स्वरूप येत असून येथे वाहतूकीची कोंडी निर्माण होते. डोणगाव येथे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठी बाजारपेठ असून परिसरातील बहुतांश खेडी जोडलेली आहे. येथूनच एसटी महामंडळाच्या अनेक बसफेºया आहेत. या ठिकाणी दररोज शेकडो प्रवासी एसटी बसने ये-जा करतात. परंतु या प्रवासासाठी बसथांबा हा राज्य महामार्गावरच असल्याने एसटी बस चालक, वाहकांना राज्य महामार्गावर बस उभ्या कराव्या लागत असल्याने डोणगाव येथे बस थांबा हा राज्य महामार्ग बनला आहे. डोणगाव येथे प्रवाशांना उभे राहण्यासाठी राज्य महामार्गावर बस थांबा फार पूर्वीपासून आहे. येथे महिला प्रवाशांसाठी कुठलीही सोय नाही. तर विद्यार्थ्यांना राज्य महामार्गावर उभे राहूनच बसची प्रतीक्षा करावी लागते. बसस्थानक नसल्याने बसचालकास बस राज्य महामार्गावर उभी करावी लागत असल्याने अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होतो. येथील पंचायत समितीपासून आमदार, खासदारापर्र्यंत शिवसेनेची सत्ता आहे, तर परिवहन मंत्री शिवसेनेचेच आहेत. परंतू लोकप्रतिनिधी डोणगाव येथे सुसज्ज बसस्थानक करण्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे प्रवाशांना राज्य महामार्गावर उभे रहावे लागते. (वार्ताहर)

टॅग्स :buldhanaबुलडाणाroad transportरस्ते वाहतूक