ना. ठाकूर चिखली दौऱ्यावर आल्या असता त्यांनी श्री शिवाजी विद्यालय परिसरातील स्व. पंढरीनाथ पाटील यांच्या समाधीस्थळी भेट देऊन अभिवादन केले. यावेळी आमदार श्वेता महाले, माजी आमदार राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य केशवराव मेतकर, आजीवन सदस्य विष्णू पडघान, मधुकर पाटील, संतोषराव डुकरे, बाबासाहेब भोंडे, सत्यजीत पाटील, स्वीकृत सदस्या प्राचार्य डॉ. पी. एस. वायाळ, व्यवस्थापन समिती सदस्य प्राचार्य डॉ. बाळासाहेब गावंडे, प्राचार्य डॉ. अनिल गारोडे, प्राचार्य कृष्णा पाटील, मुख्याध्यापक जेऊघाले, अनिरूध्द पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य केशवराव मेतकर यानी पंढरीनाथ पाटील यांच्या शैक्षणिक व सत्यशोधक चळवळीबाबत माहिती दिली. दरम्यान, समाधीस्थळाच्या विकासासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. या मागणीची दखल घेत ना. ठाकूर यांनी बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महान कार्य करणाऱ्या महामानवाच्या समाधीस्थळ विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यासह पर्यटनस्थळाचा दर्जा मिळवून देण्याबाबत आश्वस्त केले.
ठाकूर यांची पंढरीनाथ पाटील समाधीस्थळास भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:32 IST