शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

टीइटी परीक्षा शुल्काचा "गल्ला" कोटींच्या घरात!

By admin | Updated: July 3, 2017 20:37 IST

राज्यभरातून २ लाख ३० हजार अर्ज: लाखो भावि शिक्षक बेरोजगारीच्या खाईत

ब्रम्हानंद जाधव / बुलडाणा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून २०१३ पासून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येत आहे. यामध्ये दोन पेपरसाठी ८०० रुपये व एक पेपर देणाऱ्यांसाठी ५०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे. यावर्षी २२ जुलै रोजी होणाऱ्या टीईटीसाठी राज्यभरातून २ लाख ३० हजार अर्ज आले असून, दरवर्षी टीइटी परीक्षा शुल्काचा ह्यगल्लाह्ण कोटी रुपयांच्या घरात जात आहे.डी.एड्. व बी.एड्. पदविका घेऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, त्या तुलनेत शिक्षकांची भरती केल्या जात नाही. राज्यात आवश्यकतेपेक्षा जास्त अध्यापक विद्यालयांना मान्यता मिळाल्याने विषम परिस्थिती निर्माण झाली आहे. गत सात वर्षापासून शिक्षकांची भरती केली नसल्याने अध्यापक पदविका प्राप्त करणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत गेले. सर्वच डी.एड्. व बी.एड्.धारकांना नोकरी देणे शक्य नसल्याने शासनाने सन २०१३ पासून महाराष्ट्र राज्य परीषा परिषद, पुणेकडे शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याची जबाबदारी स्विकारली. पहिल्याचवर्षी मोठ्या उत्साहात लाखो भावि शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा दिली. मात्र, या परीक्षेवर केवळ शिक्षकांची पात्रता तपासण्यात येणार असून त्यांना कुठल्याही प्रकारची नोकरी लागणार नाही. यामुळे टीईटी देणाऱ्या भावि शिक्षकांमध्ये निरुत्साह निर्माण झाला. २०१३ पासून दरवर्षी शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर घेतली जात आहे.  यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी प्राथमिक स्तरावरिल पेपर एक घेण्यात येत आहे. या पेपरसाठी ५०० रुपये शुल्क ठेवण्यात आला आहे. तर इयत्ता ६ वी ते ८ वी या वर्गासाठी अध्यापन करून इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी उच्च प्राथमिक स्तरावरिल पेपर दोन घेण्यात येतो. या पेपरसाठी सुद्धा ५०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे. तसेच प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करून इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य ठेवण्यात आले असून, त्यासाठी ८०० रुपये शुल्क आकारण्यात येतो. यावर्षी २२ जुलै रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी  आवेदन पत्र व परीक्षा शुल्क आॅनलाईन भरण्याकरिता १५ जून ते १ जुलैपर्यंत कालावाधी देण्यात आला होता. यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेकडे  राज्यभरातून २ लाख ३३ हजार उमेदवारांनी आपले अर्ज भरले आहेत. यातून कोटी रुपयेंचा परीक्षा शुल्क दरवर्षी शासनस्तरावर जमा होत आहे.  मात्र, परीक्षांर्थींना नोकरीच्या प्रतीक्षेतच रहावे लागत आहे.जिल्हानिहाय यादी अद्याप अस्पष्टमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेकडे शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यासाठी यावर्षी होणाऱ्या २२ जुलै रोजीच्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी १५ जून ते १ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज भरण्यात आले. ३ जुलैपर्यंत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे केवळ राज्यभरातून आलेल्या २ लाख ३० हजार अर्जाचा आकडा आला होता. मात्र, प्रशासनाकडून जिल्हानिहाय यादी अद्याप स्पष्ट करण्यात आली नाही. अर्ज व परीक्षा शुल्क याचा सर्व ताळेबंद जुळल्यानंतर यादी स्पष्ट होणार आहे.