शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजार शेतकर्‍यांची लाभासाठी ससेहोलपट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:44 IST

मलकापूर : शेतकरी कर्जमाफी योजनेत हजारो शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. अर्थात अजूनही यादय़ा अंतिम नाहीत, त्यासाठी लाभार्थ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. त्यातील शासन व बँका यांच्यातील वेगवेगळ्या मुद्यावरुन पुढे येत असलेले ‘मिसमॅच’ सद्यस्थितीत लाभार्थ्यांच्या मुळावर उठल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देशासन आणि बँकांमधील ‘मिसमॅच’चा शेतकर्‍यांना फटका

हनुमान जगताप । लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : शेतकरी कर्जमाफी योजनेत हजारो शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. अर्थात अजूनही यादय़ा अंतिम नाहीत, त्यासाठी लाभार्थ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. त्यातील शासन व बँका यांच्यातील वेगवेगळ्या मुद्यावरुन पुढे येत असलेले ‘मिसमॅच’ सद्यस्थितीत लाभार्थ्यांच्या मुळावर उठल्याचे दिसत आहे. विदर्भ प्रवेशद्वाराच्या सुमारे दहा हजारावर शेतकर्‍यांची  कर्जमाफीच्या लाभासाठी ससेहोलपट होताना दिसत आहे.शासनाच्यावतीने शेतकर्‍यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरु करण्यात आली. त्यात कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन हजारो शेतकर्‍यांनी ऑनलाइन अर्जाचा भरणा केल्याचे सर्वश्रुत आहे. अगदी सुरुवातीपासूनच या योजनेला ग्रहण लागल्याचे वारंवार स्पष्ट झाले. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र शेतकर्‍यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.आधी यादय़ांचा घोळ, त्यानंतर कर्जमाफीसाठी पात्र लाभार्थ्यांवर नानाविध अटी व शर्ती लादण्यात आल्याने या योजनेत एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे प्रत्यक्षात किती शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाली, हा प्रश्न आधीपासूनच आतापर्यंत गुलदस्त्यातच, कारण त्या विषयावरून आजही,  शासन आणि शेतकरी यांच्यातील दुवा असलेल्या सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे कानावर हात आहेत. शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफीच्या लाभासाठी हजारो शेतकर्‍यांनी ‘ऑनलाइन’ अर्ज भरले आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामध्ये आधारकार्ड नंबरातील चुका, पासबुकवरील नावात तफावत, एकाच कुटुंबातील दोन कर्जदार, माफी मात्र एकाला, अशा विविध बाबींचे मिसमॅच लाभार्थ्यांच्या मुळावर उठल्याचे दिसत असून, परिणामी विदर्भ प्रवेशद्वारी कर्जमाफीसाठी पात्र सुमारे दहा हजारावर शेतकर्‍यांची लाभासाठी ससेहोलपट होतेय.

‘कशी बशी कर्जमाफी जाहीर झाली. अनेक अटी त्यासाठी लादण्यात आल्या. एक प्रकारे ही शेतकर्यांची थट्टाच आहे. याद्यांचा घोळही आहेच. एक प्रकारे ही गरीब शेतकर्यांची छळवणूक आहे. प्रकरणी अशा शेतकर्यांना शासनाने कर्जमाफीचा लाभ देऊन न्याय द्यावा.- दामोधर शर्मा ,जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना

सरकारला वाटतो तेवढा हुशार शेतकरी नाही, तर तो एक प्रामाणिक माणूस आहे. चुका या माणसाकडूनच होतात. त्यामुळे ऑनलाइन अर्ज भरताना चुका झाल्या असतील, त्या समजून घेतल्या पाहिजे. कर्जमाफी करुन शासनाने दाखविलेला मोठेपणा यातही दाखवायला हवा. - ज्ञानदेव ढगे, सरपंच अनुराबाद, ता.मलकापूर.

ऑनलाईन अर्ज भरताना माहिती देण्यात आली. त्यात विसंगती आहे. त्यात कुणा एकाची चूक धरता येणार्‍या नाही. आमच्याकडेही त्यापध्दतीची असंख्य प्रकरणे आली आहे. त्यावर उपाययोजना करातना चुकांची दुरुस्ती करण्यावर आम्ही भर दिला. त्यातून बरीचशी प्रकरणे निकाली निघाली आहेत. - संजय जाधव, विभागीय अधिकारी, जिल्हा केंद्रीय सहकारी बँक

टॅग्स :Farmerशेतकरीbuldhanaबुलडाणा