शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
4
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
5
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
6
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
7
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
8
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
9
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
10
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
11
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
12
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
13
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
14
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
15
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
16
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
17
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
18
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
19
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा

शिक्षक समायोजनाचे अडले घोडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 14:23 IST

 बुलडाणा: जिल्ह्यातील खासगी अनुदानीत  शाळांमधील शिक्षक समायोजनाची प्रक्रिया गत दोन महिन्यापूर्वी राबविण्यात आली होती. मात्र याप्रक्रियेतील १२ शिक्षक अद्यापही शाळेवर रुजू न झाल्याचे समोर आले आहे.

- ब्रम्हानंद जाधव

 बुलडाणा: जिल्ह्यातील खासगी अनुदानीत  शाळांमधील शिक्षक समायोजनाची प्रक्रिया गत दोन महिन्यापूर्वी राबविण्यात आली होती. मात्र याप्रक्रियेतील १२ शिक्षक अद्यापही शाळेवर रुजू न झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये काही शिक्षकांना सोयीची शाळा हवी आहे तर  काही ठिकाणी संस्थेकडूनच शिक्षकांना रुजू करून घेण्यास टाळाटाळ होत असल्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयांतर्गत होणाºया शिक्षक समायोजनाचे घोडे अडले आहे. पटपडताळणीनंतर विद्यार्थी व शिक्षक गुणोत्तर तपासून कमी विद्यार्थी व जास्त शिक्षक असलेल्या शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरविण्यात येतात. तर रिक्त झालेल्या ठिकाणी शिक्षकांचे समायोजन करण्यात येते.  संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाचा मार्ग अनेक दिवसांपासून प्रलंबीत होता. मात्र या संदर्भात ग्रामविकास विभागाने खासगी अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये समायोजन करण्याचे आदेश मागील वर्षी दिले होते. यामुळे राज्यातील बहुतांश शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्ह्यात खासगी अनुदानीत संस्थावर सुद्धा १०२ पदे रिक्त होते. त्यानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून नोव्हेंबरमध्ये शिक्षक समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्ह्यातील खासगी अनुदानीत शाळांमध्ये  ५२ शिक्षकांचे समायोजन २८ नोव्हेंबर २०१८ रोजी करण्यात आले. परंतू यामध्ये १२ शिक्षक अद्यापही शाळेवर रुजू झाले नाही. काही शिक्षक सोयीस्कर शाळा पाहिजे, म्हणून दिलेल्या शाळेवर रुजू होत नाहीत. तर काही ठिकाणी विषय नसणे, संस्थाध्यक्ष शाळेवर रुजू करू घेण्यास टाळाटाळ यासारख्या विविध कारणांमुळे समायोजनाच्या या प्रक्रियेत व्यत्यय येत आहे. यासंदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकारी पानझाडे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. 

वेतन रखडलेशिक्षक समायोजनाची प्रक्रिया पूर्ण  होऊनही काही शिक्षक संबंधीत शाळांवर रुजू झालेले नाहीत. त्यामुळे त्यांचे वेतन कसे काढावे, असा प्रश्न उपस्थित होते आहे. त्यामुळे समायोजनाच्या प्रक्रियेसह अशा शिक्षकांच्या वेतनाचाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.

शिक्षकांच्या कार्यालयात वाºयासंस्थाचालक रुजू करून घेत नाहीत, किंवा सोयीच्या ठिकाणी शाळा पाहिजे, यासाठी अनेक शिक्षक दररोज माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वाºया करत आहेत. त्यामुळे समायोजन प्रक्रियेअंतर्गत त्यांना दिलेल्या शाळेचा पदभारही काही शिक्षकांनी घेतला नाही. 

आॅफलाइन प्रक्रिया आॅनलाइनच्या काळातही शिक्षक समायोजनाची प्रक्रिया आॅफलाइन झाल्याचे दिसून येते. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयांतर्गत खासगी अनुदानीत शिक्षक समायोजन प्रक्रिया आॅफलाइन करण्यात आली आहे. मात्र यापुढे सर्व प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे होणार असल्याने अशा अडचणी येणार नाहीत, असे  संकेत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाTeacherशिक्षक