शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

खासगी क्लासेस लावण्यासाठी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांवर दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 17:36 IST

बुलडाणा : शासनाचा पगार घेणाऱ्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना स्वता:च्या खासगी क्लासेस लावण्यासाठी दबाव टाकण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. या माध्यमातून खाजगी क्लासेसची कोट्यवधीची उलाढाल होत असून याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्दे शाळेतील विद्यार्थ्यांना खाजगी कोंचिग क्लासेसला न जावू देता शाळेतील शिक्षकांकडे कोचिंग घेण्यासाठी बाध्य करण्यात येत आहे. संबंधित शिक्षकांवर आपल्यास्तरावरून कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावे, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे केली आहे.

- हर्षनंदन वाघबुलडाणा : शासनाचा पगार घेणाऱ्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना स्वता:च्या खासगी क्लासेस लावण्यासाठी दबाव टाकण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. या माध्यमातून खाजगी क्लासेसची कोट्यवधीची उलाढाल होत असून याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील गरीब, हुशार विद्यार्थ्यांची होरपळ होत आहे.स्पर्धेचे युग असल्यामुळे सर्वत्र यश मिळविण्याठी स्पर्धा तीव्र होत आहे. अनेक पालकांना आपला पाल्य डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हावा, असे वाटते. यासाठी वार्षिक तसेच सीईटी, निट, जेईई आदी परीक्षेत चांगले गुण आवश्यक असतात. यासाठी खाजगी कोचिंग क्लासेसचा आधार घेतला जात आहे. त्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांनी नोकरी न करता खाजगी क्लासेस सुरू केले आहेत. याठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी वाढत असल्यामुळे अनेक शिक्षकांचे शाळेत शिकविणे कमी झाले आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना खाजगी कोंचिग क्लासेसला न जावू देता शाळेतील शिक्षकांकडे कोचिंग घेण्यासाठी बाध्य करण्यात येत आहे. शाळेतील शिक्षक अशा विद्यार्थ्यांना आपल्या घरी किंवा शाळा परिसरात असलेल्या कथितस्तरावरील अवैध कोंचिग क्लासेसमध्ये येण्यासाठी दबाब आणतात, असा आरोप रयत क्रांती संघटनेने केला आहे.रयत क्रांती संघटनेचे निवेदनशासकीय किंवा अनुदानित शाळा, महाविद्यालयावर पगार घेवून अतिरिक्त उत्पन्नाच्या लालसेपाटी बुलडाणा शहरात अनेक शिक्षक गोरगरीब विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसा उकळून खाजगी शिकवणी वर्ग घेत आहेत. शासनाचा पगार घेवून खाजगी शिकवणी वर्ग घेणे ही कायदेशीर चुकीची बाब असल्यामुळे संबंधित शिक्षकांवर आपल्यास्तरावरून कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावे, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोनु चव्हाण, युवा प्रदेश उपाध्यक्ष संदीप मुळे, आशिष लहासे, तुषार काचकुरे आदींनी केली आहे.शाळा, कनिष्ठ महाविद्यालयास शिक्षणविभागातर्फे पत्र पाठवून खाजगी क्लासेस न घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.मात्र ज्या ठिकाणी शाळेतील शिक्षक अवैध कोचिंग क्लासेस घेताना दिसून येतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.- श्रीराम पानझाडे, शिक्षणाधिकारी माध्यमिक, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाTeacherशिक्षक