शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानासाठी शिक्षकांचा लढा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 15:14 IST

अनुदानाच्या मुद्यावरुन पश्चिम वºहाडातील एक हजारावर शिक्षक गेल्या चार दिवसांपासून नागपुरात ठाण मांडूण आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: विना अनुदानीत व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाला अनुदान पात्रतेसाठी असलेल्या १०० टक्के निकालाच्या अटीला राज्यभरातील शिक्षकांकडून विरोध दर्शविण्यात येत आहे. २० टक्के सरसकट अनुदान शासन निर्णय रद्द करण्यासाठी शिक्षकांचा शासनदरबारी लढा सुरू आहे. अनुदानाच्या मुद्यावरुन पश्चिम वºहाडातील एक हजारावर शिक्षक गेल्या चार दिवसांपासून नागपुरात ठाण मांडूण आहेत.उच्च माध्यमिकच्या शिक्षकांचे अनेक प्रश्न शासनस्तरावर प्रलंबीत आहेत. गेल्या १८ वर्षापासुन विनावेतन काम करणाऱ्या उच्च माध्यमिक व कनिष्ठ माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांना १ एप्रिल २०१९ पासून २० टक्के वेतन दिले जाईल, असा शासन निर्णय झालेला आहे. त्यामध्ये अनुदान पात्रतेसाठी १०० टक्के निकालाची अटक घालण्यात आलेली आहे. परंतू १०० टक्के निकालाच्या विरोधात राज्यभरातील विना अनुदानीत व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी पाऊल टाकले आहे. क्षेत्रीय स्तरावरील पात्र अघोषित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविलयांना घोषित करून अनुदान देण्याची मागणी या शिक्षकांमधून होत आहे. २० टक्के सरसकट अनुदानाचा शासन निर्णय रद्द करून सर्वांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यात यावे, यासाठी राज्य उच्च माध्यमिक व क़म.वि. शाळा कृती संघटनेच्यावतीने मंगळवारी विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला होता.अनुदानाच्या प्रश्नासाठी पश्चिम वºहाडातील १ हजारावर शिक्षक विधिमंडळावर धडकले आहेत. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील १५०, अकोला ४०० व वाशिम जिल्ह्यातील ५०० शिक्षकांचा समावेश आहे. परंतू आतापर्यंत शिक्षकांच्या या प्रश्नावर शासनाला तोडगा काढता आलेला नाही.१८ वर्षापासून वेतनाचा प्रश्नविना अनुदानीत व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातील २५ हजार शिक्षकांची १८ वर्ष निघुन गेली तरी आतापर्यंत त्यांना वेतनाची प्रतीक्षा आहे. प्रत्येक अधिवेशनामध्ये शिक्षक आपले प्रश्न मांडून थकले आहेत. परंतू त्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याचे दिसून येते. कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्यता देऊन त्यांच्या सोबत वेतनाची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांनी मांडली आहे.सर्व नियमानुसार पूर्तता करूनही प्रशासकीय दिरंगाईमुळे पुरवणी मागणीत शिक्षकांच्या विषयाचा समावेश न झाल्याने मुख्यमंत्र्यांनी स्वत: तसे आदेश देऊन अनुदानाचा विषय निकाली काढावा. अनुदानाचा, आर्थिक तरतुदीचा विषय मार्गी लावण्यासाठी नागपूर येथे शिक्षक धरणे देत आहेत.- प्रा. गजानन निकम, राज्य सहसचिव,राज्य उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय कृती संघटना.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाTeacherशिक्षक