शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उद्दिष्ट १५०० कोटींचे, वाटप केवळ ४५० कोटी; कर्जवाटप संथगतीने; शेतकऱ्यांचे होतात हाल

By विवेक चांदुरकर | Updated: June 17, 2024 18:16 IST

३० जूनपूर्वी पुनर्गठन केल्यास शून्य टक्के व्याज

विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव जि. बुलढाणा: जिल्ह्यात शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपाकरिता १,५०० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, १७ जूनपर्यंत केवळ ३० टक्के ४५० कोटींचेच वाटप करण्यात आले आहे. पीककर्जाचे वाटप संथगतीने सुरू असून, शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागत आहे.

खरीप हंगामात पेरणी करण्याकरिता शेतकऱ्यांंना बँकांच्या वतीने एक वर्ष मुदतीपर्यंत बिनव्याजी पीककर्ज देण्यात येते. अनेक शेतकरी बॅंकांकडून पीककर्ज घेऊन पेरणी करतात. मात्र बँकांच्या वतीने शेतकऱ्यांंना विनाकारण कागदपत्रांची मागणी करण्यात येते. तसेच त्रास देण्यात येतो. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

जिल्ह्याला १,५०० कोटी रुपयांचा पीक कर्ज आराखडा मंजूर झाला आहे. यात आतापर्यंत ३० टक्के म्हणजेच सुमारे ४५० कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना विनासायास कर्जपुरवठा व्हावा, यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्यासाठी बँकेमध्ये अर्ज करावा.

शेतकऱ्यांनी मागील खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेतलेले असल्यास पीक कर्जाची परतफेड ३० जूनपूर्वी करणे आवश्यक आहे. ३० जूनपूर्वी कर्जाची परतफेड झाल्यास शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ होणार असून शून्य टक्के व्याजदर लागणार आहे. तसेच कर्जाचे पुनर्गठन केल्यासही शून्य टक्के व्याजाने आकारणी होणार आहे.    येत्या खरीप हंगामासाठी पीक कर्जाचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यातून मुबलक प्रमाणात कर्ज पुरवठा होणार आहे. शेतकऱ्यांनी पुढे येऊन पीक कर्ज घ्यावे, तसेच शून्य टक्के व्याज दराचा लाभ घेण्यासाठी जुन्या पीक कर्जाचे ३० जून पूर्वी पुनर्गठन करायला हवे.- डॉ. किरण पाटील, जिल्हाधिकारी

टॅग्स :CropपीकFarmerशेतकरी