शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

चिखली तालुक्यात पावसाळ्यातही  टँकरचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 11:26 IST

Water Scarcity in Chikhli : सैलानी नगरची स्थिती अत्यंत गंभीर असून, पावसाळ्यातदेखील येथे टँकरने पाणीपुरवठा होतो. 

- सुधीर चेके पाटीललोकमत न्यूज नेटवर्कचिखली : यंदा जून महिना संपण्यास आला असला तरीही तालुक्यातील काही मंडळे वगळता अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने अनेक गावांमध्ये अद्यापही पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. यामध्ये आता शहराचाच एक भाग बनलेल्या सैलानी नगरची स्थिती अत्यंत गंभीर असून, पावसाळ्यातदेखील येथे टँकरने पाणीपुरवठा होतो. चिखली तालुक्यातील यावर्षी मे अखेरपर्यंत २८ गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. जून महिना सुरू झाल्यानंतर पाणीटंचाई दूर होईल, अशी अपेक्षा टंचाईची झळ सोसणाऱ्या गावांना होती. मात्र, आता पावसाळा लागलेला असतानाही तालुक्यातील उंद्री, वैरागड, हरणी, टाकरखेड मु., अमडापूर, मुंगी, धानोरी, किन्ही सवडद, घानमोड व अमडापूर ही गावे वगळता तालुक्याला अद्यापही सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा आहे. याचा परिणाम   जीवमानावर होत असल्याने किमान पाणीटंचाईतून सुटका होईल ही अपेक्षा फोल ठरली आहे. पावसाअभावी टंचाईग्रस्त गावांची भिस्त असलेल्या पाणीपुरवठ्या जलस्तोत्रांमध्ये अद्यापही मुबलक प्रमाणात जलसाठा झालेला नाही. परिणामी २८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ उन्हाळ्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना अद्यापही कायम आहेत. या अनुषंगाने २६ गावांसाठी विहिरींचे, दोन गावांसाठी बोअरचे अधिग्रहण अद्यापही कायम आहे. यापैकी १४ गावांना तीव्र पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. असोला, सैलानी नगर आणि कोलारा या तीन गावांत चार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. या अनुषंगाने खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

पाण्यासाठी टँकरवर नागरिकांची झुंबड गट ग्रामपंचायतीत समावेश असला तरी शहराशी एकजीव झालेल्या सैलानी नगर आज पाण्यासाठी मोताद झाले आहे. पालिका हद्दीवाढीच्या चक्रात फसलेल्या या भागातील नागरिकांना चक्क बादलीभर पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. पाण्याचा टँकर पोहोचताच या भागात पाणी भरण्यासाठी मोठी झुंबड उडते. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाChikhliचिखलीwater scarcityपाणी टंचाई