शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

लोणार सरोवरात जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी तीन दिवसात उपाययोजना करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 11:20 IST

असे आदेश नागपूर खंडपीठाने प्रधान सचिव (वने) यांना दिले आहेत.

बुलडाणा: लोणार सरोवर विकास व संवर्धनासाठी नागपूर खंडपीठात दाखल याचिकेवर सहा जुलै रोजी सुनावणी होवून सरोवरात जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी तीन दिवसात उपाययोजना करून त्याचा अहवाल त्वरित सादर करण्यात यावा. सोबतच लोणार येथे सहाय्यक वनसंरक्षक आणि वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांची पदे गेल्या एक वर्षापासून रिक्त असून ही पदे २२ जुलै पूर्वी भरण्यात यावी, असे आदेश नागपूर खंडपीठाने प्रधान सचिव (वने) यांना दिले आहेत.लोणार सरोवरातील पाणी गुलाबी झाल्याचा प्रकार समोर आल्यानंर नागपूर खंडपीठाने त्याची दखल घेत त्याच्या कारणांचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते. पुणे येथील आगरकर संशोधन संस्था व नागपूर येथील निरीलाही त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान सहा जुलै रोजी या दोन्ही संस्थांना संशोधनासाठी स्वातंत्र्य देत अहवाल सादर करावा, असे सुचीत केले आहे.दरम्यान, लोणार येथे सरोवरात जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे. लोणार पालिकेला तो हस्तांतरीत झालेला आहे. मात्र जून महिन्यात खंडपीठाने नियुक्त केल्या समितीने केलेल्या पाहणी दरम्यान काही आक्षेप समोर आले होते. त्यानुषंगाने पालिकेने तीन दिवसात याबाबत उपाययोजना करून तसा अहवाल खंडपीठास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सोबतच लोणार सरोवर हे वन्यजीव विभागाच्या अखत्यारित असून या ठिकाणी सहाय्यक वनसंरक्षक आणि वन परिक्षेत्र अधिकारी पदे रिक्त आहेत. त्यामुळे सरोवराचे संवर्धन व त्याचे जतन करण्याच्या कामासाठी येथे सहाय्यक वनसरंक्षक आणि वनपरीक्षेत्र अधिकाºयाचे पद २२ जुलै पुर्वी भरण्यात यावे, असे आदेशच राज्याचे प्रधान सचिव (वने) यांना खंडपीठाने दिले. यासोबतच जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या लोणार-किन्ही रोड व लोणार-मंठा रोडसाठी बायपासचा प्रश्न त्वरित निकाली काढावा, असेही आदेशीत केले आहे. बायपास बाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे.अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत नाराजीलोणार सरोवर क्षती प्रतिबंध व संवर्धनाच्या दृष्टीने दाखल याचिकेवरील सुनावणी दरम्यान जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकारी अनुपस्थित राहत असल्याचा मुद्दा खंडपीठाने गंभीरतेने घेतला. सोबतच संबंधित अधिकाºयांनी पुढील सुनावणी वेळी उपस्थित रहावे, असे आदेश दिले आहे. ज्या खात्याशी संबंधित बाबी आहेत त्या खात्याच्या प्रमुखांनी उपस्थित रहावे, असे अधोरेखीत केले. जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग व तत्सम खात्याच्या अधिकाºयांना उद्देशून ही बाब होती. 

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवरbuldhanaबुलडाणाnagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय