शहरं
Join us  
Trending Stories
1
"रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
2
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
3
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
4
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
5
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
6
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
7
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
8
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
9
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
10
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
11
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
12
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
13
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
14
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
15
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
16
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
17
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
18
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
19
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

स्वच्छ भारत मिशनलाही बसला कोरोनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 12:24 PM

Swachh Bharat Mission was also hit by Corona : जिल्ह्यातील ५० गावांपैकी केवळ १४ गावांमध्येच प्रत्यक्षात कामाला प्राधान्य देता आलले आहे. 

- नीलेश जाेशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या १६ महिन्यापासून कोरोना संक्रमणामुळे विविध क्षेत्राला फटका बसलेला असतानाच स्वच्छ भारत मिशनही (ग्रामीण) प्रभावीत झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षात घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासंदर्भात निवडण्यात आलेल्या जिल्ह्यातील ५० गावांपैकी केवळ १४ गावांमध्येच प्रत्यक्षात कामाला प्राधान्य देता आलले आहे. स्वच्छ भारत मिशनच्या पहिल्या टप्प्यात प्राधान्याने शौचालय निर्मितीला प्राधान्य देण्यात आले होते. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागातील घनकचरा व सांडपणी व्यवस्थापनाला प्राधान्य देण्यात येत आहे. गावातील लोकसंख्येच्या आधारावर संबंधित गावात अनुषंगीक व्यवस्थापनासाठी निधी दिल्या जातो. यामध्ये १५ व्या वित्त आयोगातून ३० टक्के आणी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ७० टक्के निधी दिल्या जातो. त्यातून ही कामे मार्गी लावण्यात येत आहेत. दरम्यान २०२०-२१ या आर्थिक वर्षात ५० गावांची घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी निवड झाली होती. सोबतच या गावांमधील कामाला प्रशासकीय मान्यता ही देण्यात आली होती. दरम्यान कोरोनाचे संक्रमण वाढल्यामुळे या ५० पैकी फक्त १४ गावाताच कामांना प्रारंभ झाला होता. ३६ गावातील कामे प्रलंबीत होती. विशेष म्हणजे या कामांसाठी पंचायत समितीनिहाय एकूण १ कोटी ४५ लाख ६७ हजार ८६५ रुपयांचा निधीही अदा करण्यात आला होता. प्रामुख्याने स्वच्छ भारत मिशनच्या या दुसऱ्या टप्प्यात प्रदुषणाचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला जात आहे.दरम्यान काेराेनाचे संक्रमण आता कमी झाले आहे. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षातील कामे आणि नव्याने करण्यात येणाऱ्या कामांचा वेग वाढण्यास मदत हाेईल, असा अंदाज व्यक्त हाेत आहे. 

महिन्याकाठी ३५१ टन घनकचराया गावांमध्ये महिन्याकाठी साधारणत: ३५१ टन घनकचरा निर्माण होतो. त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून गाव परिसरात होणारे प्रदुषणही कमी करण्यावर भर दिला जात आहे. साधारणत: ४४ दिवसामंध्ये अेाल्या कचऱ्यापासून खत निर्माण होणारा, अेाला व सुक्या कचऱ्यापासून गांडूळखत निर्मिताला प्रसंगी यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. यासोबतच ग्रामपातळीवरील धोकादायक कचरा, निष्क्रिय कऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने यात तंत्र विकसीत करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. पण कोरोनामुळे या उपक्रमाची व्याप्ती मधल्या काळात वाढविता आली नाही.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानbuldhanaबुलडाणा