शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

वरवट बकाल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 12:12 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे शनिवारी सकाळी 8.30 वाजता रास्तारोको केला. 

वरवट बकाल ता. संग्रामपूर : पश्चिम महाराष्ट्रातील दुध व ऊस आंदोलनाच्या धर्तीवर व विदर्भ, मराठवाडयातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे शनिवारी सकाळी 8.30 वाजता रास्तारोको केला. आता शांत बसायचे नाही, सरकारच्या मानगुटीवर बसून सोयाबीन कापसाची नुकसान भरपाई घेवू असे आवाहन करीत 20 ऑक्टोंबर रोजी चक्काजाम आंदोलनात ताकदीने रस्त्यावर उतरा असे आवाहन स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना केले होते. त्या अनुषंगाने आज वरवट बकाल येथे बस थांब्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी संघटीत होऊन दुध व ऊसाला भाव मिळवून घेतला. मात्र विदर्भातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला भाव मिळत नाही. कारण इथला शेतकरी संघटीत नाही. दुसरीकडे भाजपचे सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारला नुकसान भरपाई व जिल्हा दुष्काळग्रस्त् घोषीत करा, सोयाबीन कापसाला हमीभाव जाहीर करा व शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रूपये नुकसान भरपाई दया या बरोबरच तुर, उडीद व हरभऱ्याचे चुकारे तातडीने दया, ऑनलाईनच्या गोंधळामुळे मागील वर्षी जे शेतकरी पिकविमा भरु शकले नाही त्यांना 50 टक्के मिकविम्याची रक्क्म दया अशा विविध मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आजचे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शेतकरी विरोधी असलेल्या या भाजप सरकारचे कमळ 2019 ला औषधालाही ठेवू नका असे आवाहनही रविकांत तुपकर यांनी यावेळी केले. आंदोलनात शेतकऱ्यांनी बैलजोडी, सोयाबीन, कापूस रस्त्यावर टाकून निषेध केला तसेच टायर जाळण्यात आले. यावेळी युवकांनी वाहन अडवण्यात आले. या आंदोलनात युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर,युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष राहूल मारोडे तालुका अध्यक्ष उज्वल चोपडे, जळगाव जा. तालुका अध्यक्ष नितीन पाचपोर, योगेश मुरूख, रोषण देशमुख,सागर खानझोडे, रामेश्वर घाटे, गणेश वहितकर, गजानन आमझरे, विलास तराळे, राजू उमाळे, भगवान तायडे, मोहन पाटील यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSangrampurसंग्रामपूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना