बुलडाणा : शेतकºयांच्या पेरणीचे दिवस जवळ आलेले असून, शेतकºयांना शेतीलापाणी देण्यासाठी विद्युतची आवश्यकता असून सुद्धा त्यांच्या शेतातीलट्रान्सफार्मर जळलेल्या अवस्थेमध्ये आहेत. शेतकºयांन वेठीस धरुनट्रान्सफार्फर देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. म्हणून शेतकºयांच्याहितासाठी १० नोव्हेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भप्रमुख राणा चंदन व अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शे.रफिक शे.करीमयांच्या नेतृत्वात महावितरणच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्यात आले.शेतकºयांना ट्रान्सफार्मर तात्काळ देवून त्यांच्या पेरणीसाठी लागणाºयापाण्याचा प्रशत्न सोडवावा व जळालेल्या अवस्थेतील ट्रान्सफार्मर बदलूनशेतकºयांना लवकरातलवकर द्यावा. जर महावितरणाने शेतकºयांना ट्रान्सफार्मरदेण्यासाठी टाळाटाळ जर केली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना महावितरणच्याकार्यालयाला कुलूप ठोकेल, असा इशारा संघटनेच्यावतीने महावितरणला देण्यातआला. यावेळी ठिय्या आंदोलनामध्ये राणा चंदन, शे.रफिक शे.करीम, मीश्कीनशहा, सैय्यद जैरुद्दीन, आरीप शहा फरीद शहा, दिलीप वाघमारे, तुळशिदासइंगळे, बबन शिराळे, अमोल खंडारे, नंदु नवले, अरुण कुळकर्णी, मिलींदकुळकर्णी, उद्धव इंगळे, मोशीन शेख, दिपक सावजी, तेजराव जाधव यांच्यासहबरेच कार्यकर्ते उपस्थि होते. (प्रतिनिधी)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावितरणच्या कक्षात ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 14:24 IST
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन व अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शे.रफिक शे.करीम यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावितरणच्या कक्षात ठिय्या आंदोलन
ठळक मुद्देट्रान्सफार्मर बदलून देण्याची मागणी