शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील स्वॅब नमुन्यांची आता नागपूरात तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 11:03 IST

पूर्वी नमुने अकोला येथे पाठविण्यात येत होते. मात्र, तेथील कोविड सेंटरमधील ताण वाढल्यामुळे नमुने नागपूरला पाठविण्यात येत आहेत.

खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूरमध्ये पाठविण्यात येत आहे. त्यामुळे अहवाल यायला विलंब लागत असून, क्वारंटीन केलेल्यांना दोन ते तीन दिवस वाट पहावी लागत आहे.बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीनशेपेक्षा जास्त रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यालगतच्या शहरांमधून येणाऱ्यांमुळे जिल्ह्यात रूग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रूग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांचे तसेच कोरोनाची लक्षणे असणाऱ्यांचे स्वॅब नमुने पूर्वी तपासणीसाठी अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात येत होते. मात्र, अकोल्यात रूग्ण वाढल्यामुळे रिपोर्ट तपासणीचा ताण वाढला आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील नमुने नागपूर येथे पाठविण्यात येत आहे. बुलडाणा ते नागपूर ४०० किमी अंतर आहे. जिल्ह्यातील नमुने विशेष वाहनाने पाठविण्यात येतात. त्यानंतर आॅनलाईन अहवाल प्राप्त होतो. नागपूरवरून अहवाल यायला विलंब लागत असल्यामुळे क्वारंटीन झालेल्या रूग्णांना शासकीय रूग्णालयात तात्कळत बसावे लागत आहे. अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर रूग्णांना सुटी देण्यात येते.

बुलडाणा जिल्ह्यातील कोरोनाची लक्षणे असलेल्या तसेच रूग्णाच्या संपर्कात आलेल्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात येत आहेत. पूर्वी नमुने अकोला येथे पाठविण्यात येत होते. मात्र, तेथील कोविड सेंटरमधील ताण वाढल्यामुळे नमुने नागपूरला पाठविण्यात येत आहेत.- डॉ. प्रेमचंद पंडीतजिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणाkhamgaonखामगावnagpurनागपूरAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय