शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

जखमी नागास शस्त्रक्रिया करून दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 18:56 IST

Cobra get New life after Surgery टाकरखेड हेलगा येथे शेतात खोदकामा दरम्यान एक नाग जखमी झाला होता.

ठळक मुद्देसध्या हा साप सुखरूप असून तो हालचालही करत आहेेनागाला जिवदान देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची ही तिसरी घटना आहे.

बुलडाणा: शेतातील खोदकामादरम्यान जखमी झालेल्या नागावर (कोब्रा)  पशुचिकित्सकांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला जिवदान दिल्याची घटना २४ डिसेंबर रोजी चिखली तालुक्यातील टाकरखेड हेलगा येथे घडली. बुलडाणा जिल्ह्यात जखमी सापावर अशी शस्त्रक्रिया करून त्यास जिवदान देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची ही तिसरी घटना आहे. टाकरखेड हेलगा येथे शेतात खोदकामा दरम्यान एक नाग जखमी झाला होता. त्यावेळी तेथे नागाला कोणी हात लावला नाही. मात्र त्याची अवस्था पाहून उंद्री येथील सर्पमित्र श्याम तेल्हारकर आणि बुलडाणा येथील सर्पमित्र श्रीराम रसाळ यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर या नागास सर्पमित्रांनी चिखली येथे आणले. तेथे व्हेटरनरी डॉक्टर युवराज यांनी सापाला भुल देवून बाहेर आलेले आतडे सुयोग्य पद्धतीने व्यवस्थित केले व जखमेच्या ठिकाणी तब्बल १२ टाके दिले. सध्या हा साप सुखरूप असून तो हालचालही करत असल्याचे सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले. सध्या हा नाग उंद्री येथील सर्पमित्र श्याम तेल्हारकर यांच्याकडे ठेवण्यात आलेला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाsnakeसापwildlifeवन्यजीव