शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चालक-वाहकांच्या मुक्कामांच्या ठिकाणांचे सर्वेक्षण प्रलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 17:56 IST

खामगाव :   राज्य परिवहन महामंडळाची बस मुक्कामी थांबते त्या गावातील सर्वेक्षण प्रलंबित असल्याची वस्तुस्थिती असून, मुक्कामाची सोय नसल्याने, कधीकाळी खेड्यापाडयात मुक्कामी थांबणाºया बसेसच्या संख्येत आता घट झाली आहे.

-अनिल गवई

खामगाव :   राज्य परिवहन महामंडळाची बस मुक्कामी थांबते त्या गावातील सर्वेक्षण प्रलंबित असल्याची वस्तुस्थिती असून, मुक्कामाची सोय नसल्याने, कधीकाळी खेड्यापाडयात मुक्कामी थांबणाºया बसेसच्या संख्येत आता घट झाली आहे. आगार प्रमुखांनी सर्व्हेक्षण करून तसा अहवाल न पाठविल्याने ही वेळी आली आहे. यामुळे एसटीच्या उत्पन्नात घट झाल्याचे दिसून येते.

पुर्वी खेड्यापाड्यात एसटी बस मुक्कामी जात होत्या. त्यामुळे एसटीचे उत्पन्न वाढत होते. परंतु आजकाल मुक्कामी एसटी बसवर चालक वाहक जाण्यास तयार नाहीत. पुर्वी मुक्कामी एसटीबसवर त्याच गावातील चालक, वाहकांची ड्युटी लावण्यात येत होती. त्यामुळे साहाजीकच मुक्कामाला घरी जाण्यास मिळते, या आशेपोटी चालक, वाहक मुक्कामी बसफेºयांवर जाणे  पसंत करत होते. कालांतराने ही बाब विचारात न घेता चालक, वाहकांच्या ड्युट्या  लावण्यात आल्या. यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. चालक, वाहकांच्या झोपण्याची तसेच खाण्याची व्यवस्था होत  नव्हती. त्यामुळे मुक्कामी बसवर जाण्यास चालक व वाहक नाराजी व्यक्त करत होते.  अशातच चालक, वाहकांच्या सुरक्षेबाबत सर्व्हेक्षण करून तसा अहवाल वरिष्ठांना पाठविण्याच्या सुचना आगार प्रमुखांना  देण्यात आल्या होत्या. परंतु आगार प्रमुखांनी याबाबत सर्व्हेक्षण केले नाही तसेच अहवालही वरिष्ठांना पाठविला नाही. यामुळे मुक्कामी बसेसवर जाणाºया चालक, वाहकांना सोयीसुविधा मिळाल्या नाहीत. यामुळे चालक व वाहक मुक्कामी बसवर जाण्यास तयार होत नव्हते. याचाच परिणाम म्हणून सध्या खेड्यापाड्यात मुक्कामी जाणाºया बसची संख्या घटली असून याचा फटका एसटी महामंडळास बसला असल्याचे एसटीतील एका अधिकाºयाने सांगितले. 

सर्वेक्षण अहवालाला खो!

पश्चिम विदर्भातील अकोला-बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यात एसटी महामंडळाची १६ आगारे आहेत. यामध्ये सर्वाधिक ७ आगार बुलडाणा जिल्ह्यात आहेत. अकोला जिल्ह्यात ५ तर वाशिम जिल्ह्यात ४ आगार आहेत. यापैकी बहुतांश आगार प्रमुखांनी चालक-वाहकांच्या मुक्कामाच्या ठिकाणांचे सर्वेक्षण आणि त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयामध्ये सादर केला नसल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. अकोला, वाशिमच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्यातील आगारांची अतिशय सुमार कामगिरी असल्याचाही सुत्रांचा दावा आहे.

टॅग्स :khamgaonखामगावstate transportराज्य परीवहन महामंडळ