लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरात शिक्षणासाठी आलेल्या उंद्री येथील एका १९ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी रायगड कॉलनी भागात उघडकीस आली. उंद्री येथील रहिवासी गिरिराज सुनील मोहता हा शिक्षणानिमित्त येथील रायगड कॉलनीमधील कुलकर्णी यांच्या घरात भाड्याने राहत होता. तो शहरातील कॉलेज ऑफ मॅनेजमेंटमध्ये ११ व्या वर्गात शिक्षण घेत होता. दरम्यान, सकाळी त्याने रूममधील पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याची आजी घरी आली असता तिला दिसून आले. यावेळी आजीने आरडाओरड करून नागरिकांना घटनेची माहिती दिली. नागरिकांनी तातडीने शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सुनील मोहताचा मृतदेह ताब्यात घेऊन येथील सामान्य रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविला. सुनीलने आत्महत्या केल्याचे कारण समजले नाही.
खामगाव येथे विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:36 IST
खामगाव : शहरात शिक्षणासाठी आलेल्या उंद्री येथील एका १९ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी रायगड कॉलनी भागात उघडकीस आली.
खामगाव येथे विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
ठळक मुद्देमृत १९ वर्षीय सुनील मोहता हा उंद्री येथील रहिवासीपंख्याला गळफास घेऊन संपविली जीवनयात्राआत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट