ठळक मुद्देदोन महिन्यांपूर्वीच झाला होता घटस्फोटओढणीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्याआई-वडिलाकडे इकबाल चौकात राहत होती
लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : दोन महिन्यांपूर्वी घटस्फोट झालेल्या एका २७ वर्षीय महिलेने ओढणीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास येथील इकबाल चौकात घडली.आसमा इरफान शेख यांचा दोन महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला. तेव्हापासून ती आई-वडिलाकडे इकबाल चौकात राहत होती. दुपारच्या सुमारास घरी कुणी नसल्याचे पाहून आसमा शेख यांनी घराच्या छताला ओढणी अडकवून गळफास घेतला.