जामोद (बुलडाणा): जामोद परिसरात १0 फेब्रुवारीच्या रात्री वादळी वार्यासह जोरदार गारपीट झाली. त्यामुळे शेतकर्यांच्या शेतातील गहू, कांदा, मका भुईसपाट झाला असून, अनेक घरांची पडझड झाली आहे. मंगळवार, १0 फेब्रुवारीच्या रात्री ११ च्या सुमारास अचानक सोसाट्याच्या वार्यासह पाऊस व बोर, आवळ्याच्या आकाराची गार जवळपास दहा मिनिटे पडली. त्यामुळे ओंबी लागलेला गहू तसेच मका भुईसपाट झाला, तर कांद्याचे गारपिटीमुळे तीनतेरा झाले. त्यामुळे शेतकर्याचे स्वप्न पुन्हा भंगले आहे. मागील वर्षापासून जामोद परिसरातील शेतकर्यांवर संकटांची मालिकाच कोसळली आहे. कधी अतवृष्टी, कधी अत्यल्प पावसाळा, सततची नापिकी तर कधी गारपिटीसारख्या अस्मानी संकटांमुळे शेतकर्यांचे कंबरडे मोडले गेले आहे. त्यातच कृषिमालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव नसल्याने शेतकरी पार वैतागून गेला आहे. त्यामुळे कर्जाच्या खाईत सापडलेला बळीराजा मृत्यूला कवटाळत आहे.
अवकाळी पावसाचा फटका
By admin | Updated: February 11, 2015 23:53 IST