शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात १८ बालविवाह रोखण्यात यंत्रणेला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 12:03 IST

Child marriage गेल्या वर्षभरात  १८ बालविवाह रोखण्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाला यश आले आहे.

ठळक मुद्देएकूण ९२७ बाल संरक्षण समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत. बुलडाणा जिल्हा अग्रेसर असल्याचे एकंदरीत चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  जिल्ह्यात गेल्या वर्षभरात  १८ बालविवाह रोखण्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाला यश आले आहे. बालविवाह रोखण्यात राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत बुलडाणा जिल्हा अग्रेसर असल्याचे एकंदरीत चित्र आहे.बालविवाह रोखण्यासोबतच बालकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने जिल्ह्यात जिल्हा, तालुका व ग्रामपातळीवर एकूण ९२७ बाल संरक्षण समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत.  त्यामध्यमातून जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासोबच बालकांवर होणारे अत्याचार थांबविण्याचे प्रयत्न केले जातात. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात दोन वर्षांपासून ज्या मुला-मुलींचा विवाह ठरत आहे. त्यांचा जन्माचा दाखला बघूनच पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. यात फोटोग्राफर, मंडप व्यावसायिकांकडे बुकिंग करतानाच त्यांच्याकडून मुला, मुलींच्या जन्माचा दाखल बघितला जातो. त्यानंतरच बुकिंग केले जाते. त्यातून असे बालविवाह रोखण्यास मदत मिळत आहे. 

नववर्षात रोखले तीन बालविवाहजिल्ह्यात नववर्षात तीन बालविवाह रोखण्यात जिल्हा महिला व बाल विकास  अधिकारी कार्यालयांतर्गत रोखण्यात आले आहे. यासोबतच मोताळा तालुक्यातील कोथली येथे एक बालविवाह रोखण्यात आला होता. तेथे अल्पवयीन मुलाच थेट कुंकवाचा कार्यक्रमच घेण्यात आला होता. समुपदेशन करून संबंधिताना समज दिली.

ग्रामसेवकाची भूमिका महत्त्वाचीग्रामीण भागात बालविवाह रोखण्याच्या दृष्टीने ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे. बालविवाह प्रतिबंधासाठी तो काम करतो. त्यास सहायक म्हणून अंगणवाडी सेविका मदत करत असते. ग्रामपातळीवरील बालसंरक्षण समितीमधील हे दोघे महत्त्वाचा दुवा असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

बालविवाह कायदा काय आहे?२००६ मधील बालविवाह प्रतिबंधक कायदा असून, त्यातंर्गत मुला-मुलींचे वय हे कमी असल्यास संबंधित बालविवाह रोखण्यात येऊन संबंधित कुटुंबांचे समुपदेशन करण्यात येत. त्याचा चांगला सकारात्मक परिणाम जिल्ह्यात झाला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSocialसामाजिक