शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

एक लाखाची लाच घेताना  उपजिल्हाधिकारी अटकेत; वकिलासह अव्वल कारकूनही जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 07:08 IST

उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्यातर्फे खासगी वकील ॲड. आनंद शिवाजीराव देशमुख यांनी ही लाच स्वीकारली.

लोकमत न्यूज नेटवर्क 

बुलढाणा: जिगाव प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा वारसा हक्काने मोबदला मिळावा, यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीकडून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यम प्रकल्पाचे भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे  व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी एक लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी त्यांना एसीबीने ताब्यात घेतले आहे. बुधवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. 

उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्यातर्फे खासगी वकील ॲड. आनंद शिवाजीराव देशमुख (३२) यांनी ही लाच स्वीकारली. त्यांच्या सोबतच या प्रकरणात मध्यम प्रकल्प  भूसंपादन कार्यालयातील नागोराव महादेवराव खरात हा अव्वल कारकून तिसरा आरोपी आहे.  

सापळा रचून पोलिसांची कारवाई

- २६ डिसेंबर रोजीच्या पडताळणीदरम्यानही उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच लाच देण्यासाठी अव्वल कारकून नागोराव महादेवराव खरात यांनी तक्रारकर्त्यास प्रेरित केल्याचे समोर आले होते. 

- या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

- ही कारवाई बुलढाणा एसीबीचे प्रभावी पोलिस उपअधीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी सचिन इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :buldhanaबुलडाणा