शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सापासोबत स्टंटबाजी; वनविभागाकडून युवकाचा शोध सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 13:52 IST

खामगाव : वन्यप्राण्यांच्या जीवाशी खेळणे किंवा स्टंटबाजी करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. बुलडाणा जिल्हयातील खामगाव विभागात अशाप्रकारे सापासारख्या विषारी प्राण्यासोबत स्टंटबाजी करतानाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

- योगेश फरपटलोकमत न्युज नेटवर्कखामगाव : वन्यप्राण्यांच्या जीवाशी खेळणे किंवा स्टंटबाजी करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. बुलडाणा जिल्हयातील खामगाव विभागात अशाप्रकारे सापासारख्या विषारी प्राण्यासोबत स्टंटबाजी करतानाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकाराची दखल घेवून अशा युवकांना रोखणे गरजेचे झाले आहे.वन्यप्राण्यांसोबत छेडखानी करणे हा गुन्हा आहे हे माहिती असतानाही जंगलात अशा प्राण्यांचा शोध घेवून त्यांना पकडून त्यांच्यासोबत खेळ केल्या जातो. साप, पोपट, ससा, हरिण, काळवीट, बीबट, मोर यासारख्या प्राणी व पक्षांचा समावेश आहे. शासनामार्फत कडक कायदे केल्यानंतरही या प्रकारांना रोखणे वनविभागासमोर आव्हान ठरत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्याची जबाबदारी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची राहते. मात्र शहरासह जिल्हयात असे प्रकार रोखण्यात वनविभागाला अपयश येत असल्याचे दिसून येते. गारुड्याचे खेळ करणे, पोपट पाळणे, पोपट विकणे, ससा, लांडोर, मोर यांची शिकार करणे, घोरपडची शिकार करणे आदी प्रकार सर्रास घडत आहेत. या प्रकारांना आळा घालून वन्यप्राण्यांचे रक्षण करण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे.सापासोबत स्टंटबाजीखामगाव शहरातील व्हॉट्सअप ग्रुपवर सापासोबत स्टंटबाजी करताना एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यातील युवक कोब्रा (नाग) सोबत स्टंटबाजी करतांना दिसत आहे. चष्मा, पायासोबत त्याला डिचवत आहे. यात युवकाच्या व मित्रांच्या जीवालाही धोका संभवतो. मात्र त्याची कोणतीही पर्वा युवकाला दिसत नसून सापासोबत तीन मिनिट हा युवक खेळ करीत आहे. 

 वन्यप्राण्यासोबत खेळ करणे हा कायद्याने गुन्हा आहे. सापाबाबतीत सांगायचे झाल्यास सापाच्या प्रजातीनुसार गुन्हा कोणता हे सांगता येईल. सोशल मिडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून संबधित युवकाचा शोध घेतल्या जाईल व निश्चित कारवाई केली जाईल.

- सचीन शिंदे, प्रादेशीक वनपरिक्षेत्र अधिकारी, खामगाव

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावsnakeसापwildlifeवन्यजीव