शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

शाळेतच मिळणार विद्यार्थ्यांना दाखले; मेहकर तहसीलचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 15:39 IST

डोणगाव येथील जिल्हा परिषद शाळेतच मेहकर तहसील कार्यालयाकडून विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले विविध दाखले वाटप करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देडोणगाव येथील जिल्हा परिषद शाळेतच मेहकर तहसील कार्यालयाकडून विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले विविध दाखले वाटप करण्यात येणार आहे. डोणगाव येथेच १२ जून रोजी स्थानिक जिल्हा परिषद मुलांची शाळा आठवडी बाजार येथे शिबीराचे आयोजन केले आहे.

 

डोणगाव : इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना  पुढील शिक्षणासाठी विविध दाखले लागतात. त्यांना दाखल्यांसाठी तहसील कार्यालय किंवा तलाठी, ग्रामसेवक यांच्या मागे फिरण्याच वेळ येऊ नये, यासाठी डोणगाव येथील जिल्हा परिषद शाळेतच मेहकर तहसील कार्यालयाकडून विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले विविध दाखले वाटप करण्यात येणार आहे. १२ जून रोजी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.      दहावी व बारावीचा निकाल लागल्यानंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्राची आवश्यकता असते. त्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना तहसील व सेतू कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागतात. त्यामुळे तहसीलमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होते. ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी ही शेतकºयांची मुले आहेत त्यामुळे ऐन पेरणीच्या वेळी आपल्या पाल्यासह त्यांना तहसीलमध्ये सेतू आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयात चकरा माराव्या लागू नये, यासाठी मेहकरचे तहसीलदार संतोष काकडे यांनी डोणगाव परिसरातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना डोणगाव येथेच लागणारी प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यासाठी स्थानिक सेतू कार्यालयाच्या मदतीने डोणगाव येथेच १२ जून रोजी स्थानिक जिल्हा परिषद मुलांची शाळा आठवडी बाजार येथे शिबीराचे आयोजन केले आहे. यावेळी संबंधित तहसील कार्यालयातील चमू, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, मुख्याध्यापक हेही उपस्थित राहणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, डोमेशियल, नॉन क्रिमीलेअर असे विविध प्रमाणपत्र दिले जाणार असल्याने विद्यार्थी आणि पालकांची विविध प्रमाणपत्रासाठी होणाºया धावपळीतून मुक्तता होणार आहे. याशिवाय प्रमाणपत्र एकाच दिवसात मिळणार असल्याने विद्यार्थी व पालकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन डोणगाव सेतू संचालक अमोल ठाकरे यांनी केले आहे.

 ८५ टक्के च्या वरील विद्यार्थ्यांना मोफत प्रमाणपत्रे डोणगाव परिसरातील ज्या विद्यार्थ्यांना ८५ टक्क्याच्या वर १० वी व १२ वी मध्ये गुण घेतले आहेत, त्या सर्वांना डोणगाव सेतू संचालक अमोल ठाकरे यांच्यामार्फत प्रवेशासाठी लागणारी विविध प्रमाणपत्रे महिनाभर मोफत काढून दिल्या जाणार आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांची होणारी प्रमाणपत्रासाठीची धावपळ व सामाजिक बांधिलकी या माध्यमातून आपण हा मोफत प्रमाणपत्र काढून वाटप करण्याचा उपक्रम राबवित असल्याचे लोकमतला सांगितले.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळाMehkarमेहकर