शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकच्या निर्मुलनासाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 16:47 IST

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी चक्क स्वत:च्या हातांनी शेकडो आकर्षक कापडी पिशव्याही तयार केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी एक कृतीशील उपक्रम हाती घेत, प्लास्टिकच्या निमुर्लनासाठी पुढाकार घेतला आहे. प्लास्टिक बंदीच्या जनजागृतीसाठी ‘नो प्लास्टिक’ या मोहिमेतंर्गत सुटाळा बु. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी चक्क स्वत:च्या हातांनी शेकडो आकर्षक कापडी पिशव्याही तयार केल्या. इतकेच नव्हे तर या कापडी पिशव्यांचे प्रदर्शन भरवित प्लास्टिकच्या वापराला विरोध दर्शविला.‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेतंर्गत खामगावसह जिल्ह्यात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्लास्टिक निमुर्लनासाठी शासनस्तरावरून ११ सप्टेंबर ते १ आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा मोहिम राबविण्यात येत आहे. यामोहिमेतंर्गत जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, यामोहिमेत विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, खामगाव तालुक्यातील सुटाळा बु. येथील जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा (मुले) या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बंदीच्या मोहिमेला कृतीशील साद दिली आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कापडी पिशव्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन सुटाळा बु. येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक भोपळे, गणेश पवार, मुख्याध्यापक बी.डी. पाटील, ग्रामपंचायत सदस्य मनोज वानखडे, सोनाजी कळसकार, सातव यांच्याहस्ते करण्यात आले.संचलन एस.एम. बायस्कर यांनी केले. आभार आर. ओ. वाघ यांनी मानले. यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती होती.चिमुकल्यां विद्यार्थ्यांकडून जनजागृती!प्लास्टिक हानीकारक असल्याचा संदेश देण्यासाठी सुटाळा येथील मराठी प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी कापडी पिशव्या तयार केल्या. या पिशव्या तयार करताना टाकाऊ कापडांचा वापर करण्यात आला. काही विद्यार्थ्यांनी अतिशय कल्पकतेने या पिशव्या तयार केल्या आहेत. यामध्ये जुन्या साडी आणि ड्रेसच्या लेसचाही कल्पकतेने वापर करण्यात आला आहे.शिक्षिकांची संकल्पना !सुटाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिकांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला प्रोत्साहन दिले. तसेच विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना ‘टाकाऊ पासून टिकाऊ ’कापडी पिशव्या तयार करण्यासाठी सहकार्य केले. त्यानंतर शिक्षिका कु. एस. पी. देवगुंडे, सौ. आर.एच.चव्हाण, कु. एम. ए.हुरपडे यांच्या संकल्पनेतून शाळेत कापडी पिशव्यांची प्रदर्शन भरविण्यात आले.

टॅग्स :khamgaonखामगावStudentविद्यार्थी