शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
2
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
3
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
4
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
5
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
6
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
7
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
8
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
9
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
11
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
12
रेस्टॉरंटमध्ये झाली नजरानजर अन्...; 4 महिने अमिराला डेट करणाऱ्या अब्दु रोजिकची लव्हस्टोरी
13
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
14
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
15
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
16
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
17
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
18
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
19
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
20
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल

साफसफाई करण्यासाठी विद्यार्थ्यांना चढवले शाळेच्या छतावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 2:25 PM

बोरी अडगाव : प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद आंबेटाकळी येथील शाळेत शुक्रवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शाळेच्या छतावर साचलेला कचरा साफ करण्यासाठी शिक्षकांनी चक्क काही विद्यार्थ्यांना छतावर चढवल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराबद्दल पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

 - सचिन बोहरपी बोरी अडगाव : प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद आंबेटाकळी येथील शाळेत शुक्रवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शाळेच्या छतावर साचलेला कचरा साफ करण्यासाठी शिक्षकांनी चक्क काही विद्यार्थ्यांना छतावर चढवल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराबद्दल पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शनिवारी, २६ जानेवारीनिमित्त सर्वत्रच साफसफाई मोहीम राबिवली जात आहे. सर्वच जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा होत असतो. खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी येथील जिल्हा परिषद शाळेत शुक्रवारी सकाळी साफसफाई सुरु होती. साफसफाई करण्यासाठी कर्मचारी नाहीतर विद्यार्थ्यांनाच वापरले जात होते. मैदान साफ करणे ठीक आहे, पण शाळेच्या छतावर चढून साफसफाई करवून घेण्याचा प्रताप शाळेच्या शिक्षकांकड़ून केला जात होता. पहीली, दुसरीतील काही मुले शाळेच्या छतावर चढण्याचा प्रयत्न करीत होते. तेवढयात काही पालक शाळेच्या समोरून जात होते. त्यांनी विद्यार्थ्यांना हटकले असता, विद्यार्थ्यांनी आम्हाला शिक्षकांनीच छतावरील कचरा व झेंड्याजवळील जागा साफसफाई करण्यासाठी सांगितले अशी माहिती दिली. तेव्हा काही पालकांनी शिक्षकांना जाब विचारला. तेव्हा शिक्षकांनी हात झटकले. त्यामुळे पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून याबाबत शिक्षणाधिकाºयांकडे तक्रार करीत असल्याचे सांगितले. 

 

शाळेच्या छतावर पाने पडली होती. ही पाने काढण्यासाठी काही विद्यार्थ्यांना छतावर चढवण्यात आले. शाळेत चपराशी नाहीत. विद्यार्थ्यांकडून आम्ही कामे करून घ्यायची नाहीत का मग ?

- संभाजी  खुळे, मुख्याध्यापक, जि.प.शाळा आंबेटाकळी 

  सुदैवाने काही दुर्घटना झाली नाही. शिक्षक काय काही घडण्याची वाट पाहत होते काय. याप्रकरणाची शिक्षण विभागाने चौकशी करून संबधित शिक्षकांवर कारवाई करावी. जेणेकरून भविष्यात मुलांसोबत असे प्रकार घडणार नाहीत.

- गोपाल ठाकरे, पालक, आंबेटाकळी.

टॅग्स :khamgaonखामगावSchoolशाळाStudentविद्यार्थी