शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

 कडक संचारबंदीचा एसटी महामंडळाला फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 11:10 IST

या संचारबंदीत एसटी महामंडळाने बस सुरू ठेवल्या असल्या तरी प्रवाशी न मिळाल्याने जिल्ह्यात एकही बस धावली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाला दोन दिवसाच्या कडक संचारबंदीचा फटका बसत आहे. जिल्ह्यात शनिवार व रविवारी दोन दिवस कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. परंतू या संचारबंदीत एसटी महामंडळाने बस सुरू ठेवल्या असल्या तरी प्रवाशी न मिळाल्याने जिल्ह्यात एकही बस धावली नाही.कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन २१ आॅगस्टपर्यंत करण्यात आलेले आहे. या दरम्यान जिल्ह्यात शनिवार व रविवार दोन दिवस कडक संचारबंदी आहे. या संचारंबदीमध्ये दवाखाने व मेडीकल ह्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. परंतू एसटी महामंडळाच्या बसेसला बंद ठेवण्याबाबतचे कुठलेही निर्देश नसले तरी, प्रवाश्यांअभावी शनिवारी सर्व बसेस उभ्याच होत्या. ५० टक्के प्रवाशी असल्यास बस सोडण्याचे एसटी महामंडळाचे नियोजन आहे. मात्र शनिवार व रविवारच्या कडक संचारबंदीमुळे एकही प्रवाशी बसस्थानकावर फिरकला नाही. त्यामुळे या संचारबंदीच्या दोन्ही दिवशी एसटीला फटका बसला आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे एसटीचे अर्थचक्र बिघडलेले आहे. आर्थिक संकटात असलेल्या महामंडळाकडून उत्पनन वाढीसाठी तडजोड करण्यात येत आहे. त्यात मालवाहतूकीचा पर्याय एसटीसाठी फायद्याचा ठरला. मालवाहतूकीतून साडे सहा लाख रुपये उत्पन्न झाले आहे. परंतू प्रवाशी वाहतूकीचे गणित अद्यापही रुळावर आलेले नाही. शहरी भाग वगळता इतर ठिकाणच्या बसफेऱ्या प्रवाशांअभावी बंद कराव्या लागल्या. दोन दिवस पुकारलेल्या या बंदमुळे एसटीच्या आर्थिक संकटात आणखी भर पडणार आहे.

बसस्थानकावर शुकशुकाटजिल्ह्यात शनिवार व रविवारी कडक संचारबंदीमुळे बुलडाणा बसस्थानकावरही शुकशुकाट दिसून आला. दोन्ही दिवस बसस्थानकावरून एकही बस गेली नाही. आर्थिक अडचणीत असलेल्या एसटीला आता प्रवाशांची प्रतीक्षा करावी लागत आहे. एसटी महामंडळाच्या सातही आगारामध्ये तांत्रिक कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कुणीही हजर नव्हते. सध्या एसटी बस चालक व वाहकांनाही ड्यूटीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

लॉकडाऊनमुळे शहरात शांतता

लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीमुळे शनिवार व रविवारी शहरात शांतता दिसून आले. चिखली रोड, मलकापूर रोडसह शहरातील जयस्तंभ चौक, संगम चौक, सर्क्युलर रोड, कारंजा चौक, धाड नाका या परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. प्रत्येक वाहनाची तपासणी होत असल्याने सर्वत्र शांतता दिसून आली. खासगी वाहनेही बंद करण्यात आली होती. नियम मोडणाºयांवर दंडात्मक कारवाई केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportएसटी