शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बळकट होतेयं लोकशहीची भिंत; सामान्यांचाही प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 18:00 IST

लोकशाहीच्या भिंतीचा उपक्रम नाविन्यपूर्ण ठरला असून मतदान विषयक संदेश नोंदविण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये येणा-या सर्व समान्यांचा सुध्दा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

बुलडाणा: आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या व्यापक मतदार जाणीव जागृतीसाठी लोकशाहीच्या भिंतीचा उपक्रम नाविन्यपूर्ण ठरला असून मतदान विषयक संदेश नोंदविण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये येणा-या सर्व समान्यांचा सुध्दा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाने यावेळी धडाडीची मोहीम हाती घेतली आहे. दिव्यांग, महिला, जेष्ठ नागरिक, नव मतदार या विशेष घटकांसोबतच सर्वसामान्य मतदारांना सुध्दा मतदान प्रक्रीयेत सहभागी व्हावे, यासाठी प्रोत्साहीत करण्याकरीता मतदार जाणीव जागृती मोहीमेअंतर्गत व्यापक दृष्टीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांचा एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाने विविध शासकीय कार्यालये व महाविद्यालयांमध्ये लोकशाहीची भिंत उभी केली आहे. मतदारांनी या भिंतीवर मतदान विषयक संदेश देणा-या आपल्या भावना लिहून त्याखाली आपली स्वाक्षरी नोंदविणे, असे या उपक्रमाचे स्वरूप आहे.त्याअनुषंगाने बुलडाणा जिल्हा परिषदेच्या आवारात सुध्दा ही भिंत उभारण्यात आली असून विभागीय आयुक्त डॉ. पियूषसिंग यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता. विभागीय आयुक्तांनी सुध्दा या भिंतीवर आपला संदेश नोंदवून मतदारांना आवाहन केले आहे. त्यानंतर आता मात्र कुतुहलापोटी सर्वसमान्यांकडून सुध्दा या भिंतीचे निरीक्षण केल्या जात असून अनेकांनी अप्रतिम अशी घोषवाक्य यावर नोंदविल्याचे दिसून येते आहे. जीवनासाठी रक्तदान, लोकशाहीसाठी मतदान अशी तुलना करतांना काही मतदारांनी मतदान हाच लोकशाहीचा पंचप्राण असल्याची भावना सुध्दा व्यक्त केली आहे.दरम्यान,  बुलडाणा लोकसभा मतदार संघासाठी येत्या १८ एप्रिलला होणा-या मतदानाच्य दिवशी सुध्दा जिल्ह्यातील मतदारांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग मिळेल यासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार उघडलेली जाणीव जागृती मोहीम यशस्वी राहील, असा विश्वास व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील सर्व घटकांनी सुध्दा या मतदार जाणीव जागृती मोहीमेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. निरूपमा डांगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस. यांनी केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा