देऊळगावराजा (जि. बुलडाणा): रेल्वे संघर्ष समितीच्यावतीने जालना-खामगाव रेल्वे मार्गासाठी १८ फेब्रुवारी रोजी शहरातील राज्य मार्गावर रास्ता रोको करण्यात आले. यात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. जालना-खामगाव रेल्वे मार्ग व्हावा, या मागणीसाठी गत अनेक वर्षांं पासून संघर्ष सुरू आहे. मागील वर्षी देऊळगावराजा संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली होती. गुरुवारी शिवसेना नेते गोविंद झोरे, भाजप नेते दादा व्यवहारे यांच्या नेतृत्वात स्थानिक स्टेट बँकेसमोर सोलापूर-मलकापूर राज्य मार्गवर समिती सदस्यांसह नागरिकांनी रास् ता रोको आंदोलन केले. यावेळी ह्यरेल्वे मार्ग झालाच पाहिजेह्ण अशा घोषणा देत कार्यकर्त्यांंनी रस्त्यावर ठाण मांडले. आंदोलनात माजी नगराध्यक्ष कवीश जिंतूरकर, समिती सचिव गणेश डोके, उपाध्यक्ष पुरुषोत्तम धन्नावत, श्याम गुजर, दीपक बोरकर, जितेंद्र खंडारे, प्रवीण धन्नावत, वसंतअप्पा खुळे, विलास खराट, विकास कासारे, मोरेश्वर मिनासे, डॉ. शंकर तलबे, शिवाजी कुहिरे, कल्याण चांडगे, राजू इंगळे, जगदीश कापसे, शिवाजी वाघ, विजय पारिख, वनवे, धन्नावत, भगवान तिडके, सन्मती जैन, मुशीर कोटकर, सुषमा राऊ त , पंडित , अशरफ पटेल, म. जमील आदींची उपस्थिती होती. दरम्यान, संघर्ष समितीने तहसीलदार बुटले यांच्यामार्फत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना निवेदन दिले.
जालना-खामगाव रेल्वे मार्गासाठी रास्ता रोको
By admin | Updated: February 19, 2016 01:42 IST