शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

धावत्या एसटीने घेतला अचानक पेट, चालक-वाहकाच्या शर्थीच्या प्रयत्नांनी टळला अनर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 8:33 PM

शॉर्ट सर्किटमुळे धावत्या एसटीने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून धावती बस रस्त्याच्या कडेला उभी केली.

खामगाव :  शॉर्ट सर्किटमुळे धावत्या एसटीने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून धावती बस रस्त्याच्या कडेला उभी केली. वाहकाच्या मदतीने आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. बसमधील सर्वच ३८ प्रवाशांची सुखरूप सुटका झाली. चित्रपटाच्या कथानकाला साजेसा हा प्रकार गुरुवारी रात्री ८.४५ वाजता अकोला-खामगाव मार्गावरील बाळापूर फैलानजीक घडली.औरंगाबाद आगाराची एमएच २० बीएल ३८०४ ही एशियाड बस अकोला येथून औरंगाबादकरिता निघाली. खामगावपासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावरील एका पेट्रोलपंपासमोर या बसने अचानक पेट घेतला. त्यामुळे बसमधील प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. दरम्यान, चालकाने वेळीच बस रस्त्याच्या कडेला उभी केली. वाहकाच्या मदतीने या प्रवाशांना उतरविण्यात आले. त्यानंतर बसमधील ड्राय केमिकल पावडर बंबाच्या साहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली. दरम्यान, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घाबरगुंडी उडाली होती. काही प्रवासी धावत लोकवस्तीकडे निघाले होते. शार्ट सर्कीटमुळे बसने पेट घेतला. ही आग विझविण्यात येऊन प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली.